आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवेक चौहानचा चित्रपट:मिथुन, संजय, सनी आणि जॅकीचा ‘बाप’ चित्रपटातील लूक पोस्टर जारी

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त, सनी देओल आणि जॅकी श्रॉफ सध्या आपल्या आगामी ‘बाप’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. या चौघांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. आता ते प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकत्र पडद्यावर येत आहेत. निर्मात्यांनी चित्रपटातील चौघांचा लूक जारी केला आहे. याआधी जूनमध्ये जॅकी आणि संजयने एक छायाचित्र शेअर करत या चित्रपटाच्या चित्रीकरणाची माहिती दिली होती. विवेक चौहान या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

हा एक अॅक्शन एक्शन ड्रामा आहे. झी स्टुडिओजचे अहमेश खान याची निर्मिती करत आहेत, असे वृत्त आहे. याशिवा सनी आपल्या होम प्रॉडक्शनच्या ‘अपने 2’ आणि ‘गदर’च्या सिक्वेलचेही चित्रीकरण करत आहे. जॅकी पुढे ‘सिंघम 3’मध्ये दिसणार आहे तर संजय ‘द गुड महाराजा’ चित्रपटात दिसेल. मिथुनही रामगोपाल वर्मा यांच्या चित्रपटात दिसणार आहे

बातम्या आणखी आहेत...