आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यकथेवर आधारित:मधुर भांडारकरच्या ‘इंडिया लॉकडाऊन'चा IFFI 2022 मध्ये प्रीमियर

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुर भांडारकरच्या ‘इंडिया लॉकडाऊन' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, सई ताम्हणकर, अहाना कुमार, प्रकाश बेलावेदी सारखे कलाकार आहेत. आता या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये झाला आहे. फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाची खूप प्रशंसा झाली. याबाबत मधुर यांनी सांगितले, "हे ‘इंडिया लॉकडाऊन'चे पहिले स्क्रीनिंग होते. चित्रपट सर्वांनाच खूप आवडला आहे. सर्व कलाकारांचे कौतुक झाले. लोकांच्या या फीडबॅकमुळे मी आनंदी आहे. प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट जगभरातील लोकांना आवडेल.’ हा चित्रपट कोविड-१९ दरम्यान जगभरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमधील घटनांवर आधारित आहे. बहुतांश चित्रीकरण मुंबई आणि परिसरात झाले आहे. दोन डिसेंबर रोजी झी5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...