आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनटायटल्ड सीरीज:रीतम श्रीवास्तवच्या वेबसिरीजमधून मनीष पॉल करणार ओटीटी पदार्पण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही प्रेझेंटर, कॉमेडियन आणि अभिनेता मनीष पॉल मोठ्या पडद्यानंतर आता ओटीटीवर पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. स्वत: मनिषनेच याला दुजोरा दिला आहे. तो लवकरच रीतम श्रीवास्तव दिग्दर्शित थ्रिलर ड्रामा वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. या प्रोजेक्टबाबत अधिक काही न सांगता, तो म्हणाला की, ‘माझे टॅलेंट दाखवणाच्या संधी देणाऱ्या भूमिका मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. हा प्रोजेक्ट माझ्याकडे आल्यानंतर मला खूप आनंद झाला कारण आता मला काहीतरी वेगळे करताना लोक पाहतील. असे वाटते की एक दरवाजा बंद झाला की तुमच्यासाठी दुसरा दरवाजा उघडतो. ‘झलक दिखला जा’ शोनंतर करण सरांनी मला ‘जुग जुग जियो’ची ऑफर दिली होती.

बातम्या आणखी आहेत...