आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्ट ड्रामा:मनोज वाजपेयींच्या आगामी ‘बंदा' चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आऊट

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनोज वाजपेयी अापल्या आगामी कोर्ट रूम ड्रामा चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर मेकर्सनी त्याचे नावही सांगितले आहे. नुकतेच मनोज यांनी आपल्या या कोर्ट रूम ड्रामा चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. चित्रपटाचे नाव असेल ‘बंदा'. त्याची पूर्ण पंच लाइन अशी ..‘सिर्फ एक बंदा ही काफी है.’ या चित्रपटातून पुन्हा एकदा ते प्रेक्षकांची करमणूक करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. चित्रपटाचे पोस्टर मनोज यांनी आपल्या सोशल मिडीया अकांउटवर शेअर केले आहे. त्यांनी खाली काही हिंदी ओळीही लिहिल्या आहेत त्या अशा...‘एक बंदा है, जो सच के लिए लडता आहे. एक वकील की कहानी, जो तमाम विषमताओं के बीच सच और न्याय के लिए लडता आहे. एक ऐसे इन्सान की कहानी को पेश करता हूं, जो कभी हार नहीं मानता...’ ही भूमिका करणे सन्मानाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक अपूर्व सिंह कार्की हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी ओटीटीवर अनेक चित्रपट केले आहेत. चित्रीकरण जोधपूर आणि मुंबईत करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...