आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षांपूर्वीचे प्रकरण:राखी सावंत चुंबनप्रकरणी मिका सिंह हायकोर्टात; विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री राखी सावंतने १७ वर्षांपूर्वी आपल्याविरोधात दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्याची विनंती पॉप गायक मिका सिंह याने उच्च न्यायालयात केली आहे. आमच्यामधील मतभेद आता संपले असून आम्ही आता चांगले मित्र असल्याचा दावा मिका सिंगने याचिकेत केला आहे.

राखी सावंतच्या संमतीने गुन्हा रद्द करण्याची याचिका सोमवारी न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि पी.डी. नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी समोर आली. राखीचे वकील आयुष पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले की, राखी सावंत हिने गुन्हा रद्द करण्यास संमती देणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागातून गहाळ झाले आहे. त्याचा शोधही लागला नाही. त्यानंतर न्यायालयाने पुढील आठवड्यापर्यंत नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश या वेळी दिले.

2006 मध्ये मिका सिंगने राखीला जबरदस्तीने किस केले होते
2006 मध्ये मिका सिंगने राखीला तिच्या वाढदिवशी सार्वजनिकरित्या किस केले होते. या घटनेवरून बराच गदारोळ झाला होता. राखीच्या तक्रारीवरून मिकावर भादंवी कलम 354 (विनयभंग) आणि 323 (प्राणघातक हल्ला) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मिका बेपत्ता झाला होता. नंतर त्याला अटक करण्यात आली होती. पण नंतर जामिनावर त्याची सुटका झाली होती.