आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकॉलॉजिकल थ्रिलर:तापसीच्या ‘ब्लर'चे मोशन पोस्टर प्रदर्शित, 9 डिसेंबरला झी 5 वर येणार

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तापसी पन्नूच्या ‘ब्लर' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. दिग्दर्शन अजय बहल यांनी केले आहे. चित्रपटगृहांत ‘शाबाश मितू' आणि ‘दोबारा'सारखे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर तापसीचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तापसीने हे मोशन पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याखाली तिने लिहिले आहे, ‘जे दिसते त्यापेक्षा अधिक नेहमीच असते.' यासोबतच तिने सांगितले, की येत्या ९ डिसेंबर रोजी झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो प्रदर्शित होईल. झी स्टुडियोज आणि आऊटसायडर्स फिल्म्सद्वारे निर्मित हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट असून, त्यात तापसीसोबत गुलशनही मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटात तापसी अशा एका मुलीची भूमिका साकारत आहे, जी आपल्या जुळ्या बहिणीच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहे, मात्र तिची दृष्टी हळूहळू अधू होत आहे. स्पॅनिश हॉरर थ्रिलर चित्रपट ‘जूलियाज आइज'चा हा हिंदी रीमेक आहे.

बातम्या आणखी आहेत...