आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर्घकाळानंतरचे पुनरागमन:निर्माते प्रकाश झा यांच्या आगामी वेबसिरीज ‘लाल बत्ती’ मध्ये दिसतील नाना पाटेकर

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाना पाटेकर बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहेत. आता बातम्या येत आहेत की ते लवकरच प्रकाश झा यांच्या आगामी ‘लाल बत्ती' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहेत. नाना जवळपास २ वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. उपलब्ध माहितीनुसार, नानांनी स्वतः प्रकाशच्या मालिकेत काम करणार असल्याची पुष्टी दिली आहे. मालिकेत नानासोबत मेघना मलिकही दिसणार आहे. यात ती त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. नाना आणि प्रकाश एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी "राजनिती' चित्रपटातही एकत्र काम केले आहे. नाना शेवटचे २०२२ मध्ये आलेल्या तडका चित्रपटात दिसले होते. अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या मी टू च्या आरोपांमुळे त्यांना बराच काळ चित्रपटांपासून दूर राहावे लागले होते.

बातम्या आणखी आहेत...