आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रभास आणि कृती सेनन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या आदिपुरुष चित्रपटाचे नवे पाेस्टर रिलीज केले आहे. हनुमान जयंतीचे औचित्य साधून हनुमानाचा नवा लूक शेअर करण्यात आला आहे. चित्रपटात देवदत्त नागे लवरकच रामभक्त हनुमानाच्या रूपात दिसणार आहे. शक्ती, विश्वास आणि निष्ठेचे प्रतीक महाबली हनुमानाच्या रूपात देवदत्त नागे खूपच प्रभावशाली दिसत आहेत. चित्रपटाचे हे पोस्टर दिग्दर्शक ओम राऊतने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, रामभक्त आणि रामकथेचे जीवन... जय पवनपुत्र हनुमान. याआधी रामनवमीच्या मुहूर्तावर या चित्रपटातून भगवान श्री राम, सीता आणि लक्ष्मण यांचा लूक शेअर करण्यात आला होता. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट २डी, ३डी, ३डी आयमॅक्स अशा फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १६ जून रोजी जगभरातील सुमारे २० हजार स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे बजेट ६०० कोटी आहे. एवढेच नाही तर या चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतात तो तामिळ, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि ओरिया भाषेत प्रदर्शित होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.