आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोदी भयकथा:वरुण धवन आणि कृती सेननच्या  ‘भेडिया’चा नवा प्रोमो प्रदर्शित

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुण धवन आणि कृती सेनन स्टारर ‘भेडिया' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘बाकी सब ठिक' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. त्याचवेळी निर्मात्यांनी चित्रपटाचा नवा प्रोमोही प्रदर्शित केला आहे. ज्यामध्ये चित्रपटातील काही मनोरंजक दृश्ये दाखवण्यात आली आहेत.

प्रोमोची सुरुवात हिरव्यागार जंगलाने होते, पण पुढच्याच क्षणी एक लांडगा प्रोमोमध्ये शिरतो आणि लोकांवर हल्ला करताना दिसतो. यासोबतच कृती आणि वरुणमधील बाँडिंगही प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे.

कृतीनेही हा प्रोमो तिच्या अकाउंटवर शेअर केला आहे. दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...