आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे उद्घाटन 31 मार्च 2023 रोजी झाले. या सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात देशातील आणि जगातील सर्वच दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. टॉम हॉलंड, जैंड्या, गिगी हदीद यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनीही सांस्कृतिक केंद्राच्या गुलाबी कार्पेटवर वॉक केले, त्यामुळे या केंद्राकडे जगाच्या नजरा खिळल्या.
हे सांस्कृतिक केंद्र रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. इथे नीता अंबानी यांना भारतीय कलेला एक मंच देऊन जगासमोर न्यायची इच्छा आहे. या केंद्राला भव्यता देण्यासाठी त्याच्या एका भव्य थिएटर भागात 8400 हून अधिक स्वारोवस्की क्रिस्टल्स वापरण्यात आले आहेत.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या चौथ्या दिवशी जाणून घ्या, त्याचे व्हिजन आणि हे केंद्र कसे आहे...
बॉलीवूड, हॉलीवूड, राजकारण, अध्यात्माशी संबंधित सेलिब्रिटींनी सजले पिंक कारपेट
NMACC चे उद्घाटन 31 मार्च रोजी झाले. यादरम्यान, भारतीय सेलिब्रिटी रजनीकांत, शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पदुकोण, रश्मिका मंदान्ना, प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी गुलाबी कार्पेटवर या केंद्राकडे देशभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला हॉलिवूड आणि जगभरातील काही कला-संबंधित सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती, ज्यात स्पायडर-मॅन फेम अभिनेता टॉम हॉलंड, जैंड्या, गिगी हदीद, निक जोन्स या कार्यक्रमासाठी खास भारतात आले आहेत.
राजकारणाशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हेही या कार्यक्रमाचा भाग होते.
सद्गुरु जग्गी वासुदेव, स्वामी नारायण, राधानाथ स्वामी, रमेश भाई ओझा, स्वामी गौर गोपाल दास यांसारखे आध्यात्मिक लोकही कार्यक्रमाला उपस्थित होते.
नीता अंबानी यांच्या सांस्कृतिक केंद्राचे उद्दिष्ट
नीता अंबानी यांनी वयाच्या 6 व्या वर्षी भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली, जे कालांतराने त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले. नीता अंबानींसाठी भरतनाट्यम हे ध्यानासारखे आहे. नीता यांना कलेबद्दल विशेष प्रेम आहे, म्हणून त्यांनी एका सांस्कृतिक केंद्राचे स्वप्न पाहिले जे कलाकार, कलाप्रेमी आणि त्या संबंधीत लोकांना एक समान जागा देऊ शकेल. हा त्यांना अनेक वर्षांपासूनचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये नीता अंबानींना त्यांची मुलगी ईशा अंबानी यांनी मदत केली आहे. या सांस्कृतिक केंद्रात कलेशी संबंधित सर्व काही असेल, जेणेकरून भारतीय कलेची जागतिक स्तरावर ओळख होईल.
हे सांस्कृतिक केंद्र लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांच्यासाठी मोफत
या सांस्कृतिक केंद्रात संगीत, नृत्य, डिझायनिंग, फॅशन, हस्तकला या विषयांशी संबंधित चर्चासत्र, कार्यक्रम आणि पुरस्कार दररोज आयोजित केले जातील, ज्यासाठी वेगवेगळ्या श्रेणींसाठी वेगवेगळ्या तिकिटांचे दर निश्चित केले जातील. या सांस्कृतिक केंद्रात सर्वसामान्यांना तिकीट काढून त्यांचा आवडता कार्यक्रम पाहता येणार आहे. त्याचबरोबर कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हे सर्व कार्यक्रम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत ठेवण्यात आले आहेत.
सांस्कृतिक केंद्र 5 भागांमध्ये विभागलेले
NMACC ची रचना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांनी केली आहे, जी 5 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागली गेली आहे. द ग्रँड थिएटर, द स्टुडिओ थिएटर, द क्यूब, आर्ट हाऊस आणि धीरूभाई अंबानी स्क्वेअर यात विभागणी करण्यात आली आहे.
कोणता भाग कसा वापरला जाईल?
ग्रँड थिएटर हे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्टेज असलेले आणि 2000 आसनांसाठी आसनव्यवस्था असलेले एक प्रकारचे भव्य सभागृह आहे. हे भव्य थिएटर सोनेरी आणि लाल रंगाच्या थीमवर तयार करण्यात आले आहे, जेथे बसण्यासाठी फ्लोरिंग सिंटिंग व्यतिरिक्त दोन मोठ्या बाल्कनी आहेत. हे ठिकाण भव्य बनवण्यासाठी 8500 हून अधिक स्वारोवस्की क्रिस्टल्स वापरण्यात आले आहेत. 18 डायमंड बॉक्सही येथे बनवण्यात आले आहेत.
हे एका मिनी ऑडिटोरियमसारखे आहे जिथे 250 गेस्ट एकत्र येऊ शकतात. हे विशेषत: लहान सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी डिझाइन केले गेले आहे, जेथे एक छोटा स्टेज देखील बांधण्यात आला आहे. कमी प्रकाशात येथे नृत्य, संगीत, खेळ आणि कार्यक्रम होऊ शकतात.
ही क्यूब आकाराची अंतरंग जागा आहे, जिथे 125 जणांची बसण्याची व्यवस्था आहे. हे विशेषतः कार्यशाळा आणि सेमिनारसाठी डिझाइन केलेले आहे. या ठिकाणी तिन्ही बाजूंनी आसनव्यवस्था आहे, जिथे कोणत्याही प्रकारचा स्टेज नाही.
हे चार मजली असून 16,000 चौरस फूट क्षेत्र आहे, जेथे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील व्हिज्युअल कला प्रदर्शित केली जाऊ शकते. कलेशी संबंधित प्रदर्शनासाठी ही जागा खास तयार करण्यात आली आहे.
हा सांस्कृतिक केंद्राचा बाह्य भाग आहे, जिथे एक मोठा कारंजा तयार करण्यात आला आहे. हा कारंजा आग, पाणी, संगीत, लाईट या थीमवर डिझाइन केलेला हे, जे पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव देते. त्याला फाउंटन ऑफ जॉय असे नाव देण्यात आले आहे. हे 392 नोजल, 664 एलईडी दिवे, 8 फायर शूटर आणि 45 फूट उंचीवर जाणारे वॉटर जेट्सने सज्ज आहे.
कल्चरल सेंटरमध्ये 3 एप्रिलपासून संध्याकाळी 7:30 ते 8:00 पर्यंत दररोज 30 मिनिटांचा फाउंटन शो सुरू होईल. फाउंटन शो सुरू होण्याच्या 60 मिनिटे अगोदर या ठिकाणाचे दरवाजे उघडले जातील. फक्त वृद्ध, गरोदर महिला आणि गरजू लोकांसाठीच बसण्याची व्यवस्था असेल.
सांस्कृतिक केंद्राचे बुकिंग सुरू, अनेक शो आधीच फुल
या सांस्कृतिक केंद्रात दररोज कलेशी संबंधित अनेक कार्यक्रम होणार आहेत, ज्यासाठी सध्या तिकीटाची किंमत 199 ते 500 रुपये आहे. येत्या काही दिवसांत अनेक कार्यक्रम आधीच ठरलेले आहेत, त्यापैकी अनेक शो आधीच हाऊसफुल्ल झाले आहेत.
यामुळे NMACC चे उद्घाटन चर्चेत
सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात नीता अंबानी यांच्या परफॉर्मन्सने झाली. नीता यांनी रघुपती राघव राजा राम या गाण्यावर भरतनाट्यम परफॉर्मन्स दिला.
आमिर खान, रजनीकांत, सचिन तेंडुलकर यांनीही पिंक कार्पेटवर हजेरी लावली.
मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी पत्नी श्लोका अंबानीसोबत कार्यक्रमात पोहोचला. इव्हेंटमध्ये श्लोका अंबानी यांनी बेबी बंपसोबत पोज दिली.
या कार्यक्रमात शाहरुख खानची पत्नी गौरी, मुलगा आर्यन, मुलगी सुहाना देखील पोहोचले. पापाराझीसाठी पोज देत असताना सलमान खानही तिथे पोहोचला आणि शाहरुखच्या कुटुंबासोबत पोज दिली.
प्रियांका चोप्रा देखील पती निक जोन्स सोबत या कार्यक्रमासाठी खास भारतात आली आहे.
उद्घाटन समारंभाच्या दुसऱ्या दिवशी मेट गाला नाईट आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भारतीय कला आणि संस्कृतीचे प्रदर्शन करणारे डिझायनर कपडे परिधान करून बहुतेक सेलिब्रिटी पिंक कार्पेटवर पोहोचले होते. हॉलिवूड अभिनेत्री जैंड्या ने निळ्या आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती.
पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या साडीत गिगी हदीदने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या दिवशी गिगीने राहुल मिश्राचा डिझायनर पोशाख परिधान केला होता, तर तिचा साडीचा लुक अबू जानी संदीप खोसला यांनी तयार केला होता.
या कार्यक्रमात शाहरुख खानने झूम जो पठाण या गाण्यावर सादरीकरण केले, ज्यामध्ये वरुण धवन आणि रणवीर सिंग देखील सामील झाले होते.
कार्यक्रमात परफॉर्म करत असताना वरुण धवनने गिगी हदीदला स्टेजवर बोलावले आणि तिला आपल्या उचलले. गीगीच्या वागण्यावरुन ती थोडी अस्वस्थ दिसत होती, त्यामुळे सोशल मीडियावर लोक वरुणच्या या कृतीचा निषेध करत आहेत. मात्र, हे नियोजित असल्याचे वरुणने स्पष्ट केले आहे.
आलिया भट्टने पहिल्या दिवशी रिया कपूरने डिझाइन केलेली चांदेरी साडी घातली होती, तर दुसऱ्या दिवशी तिने एली साबचा गोल्डन ड्रेस घातला होता. यादरम्यान आलियाने रश्मिका मंदान्नासोबत नाटू-नाटू गाण्यावर डान्स परफॉर्मन्सही दिला.
शबाना आझमी, अनुपम खैर असे अनेक सेलिब्रिटी कला सादर करणार
कैफी और मैं- शबाना आझमी 10-11 एप्रिल रोजी द स्टुडिओ थिएटरमध्ये तिचे पती जावेद अख्तर यांनी लिहिलेली तिचे वडील कैफी आझमी यांची प्रेमकथा सादर करणार आहेत. तसेच अनुपम खैर देखील ‘कुछ भी हो सक्ता है’ चे सादरीकरण करणार आहेत. येत्या काही दिवसांत या सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून अनेक दिग्गज व्यक्ती आणि कलेशी निगडित व्यक्ती आपल्या कलेचे प्रदर्शन करणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.