आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षी उत्तर भारतातदेखील कन्नड चित्रपट ‘केजीएएफ २’ आणि ‘कंतारा’ने झेेंडे रोवले होते. आता नवीन वर्षात तेथून ‘कब्जा’ जोरदार प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. यावर बॉलीवूड निर्माते आनंद पंडित यांनीदेखील मोठा डाव लावला आहे. ते या चित्रपटाची सहनिर्मिती करत आहेत. यात किच्चा सुदीप आणि तेथील स्टार उपेंद्र राव मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा स्वातंत्र्यच्याा काळातील आहे. याविषयी आनंद पंडितने सांगितले...,‘ज्या प्रकारे स्वातंत्र्याच्या आधीचा भारत आणि नंतरचा भारत वेगवेगळा होता. त्याचप्रमाणे कोरोना काळाच्या आधीचा सिनेमा आणि नंतरच्या सिनेमात अंतर राहणार आहे.
कन्नडमध्ये शूट झाला चित्रपट, इतर भाषांतही होणार डब
आनंदच्या मते, आजच्या प्रेक्षकांना जसा चित्रपट हवा आहे ‘कब्जा’ तसाच आहे. आम्ही उत्तरेत १२०० पडद्यावर रिलीज करणार आहोत. हा मूळ रूपाने कन्नडमध्ये शूट झाला आणि इतर भाषेत डब केला जाईल. ‘कब्जा’ चित्रपटाची तुलना थेट ‘केजीएफ २’शी होणार असल्याचे आनंद मान्य करतात. आनंदच्या म्हणण्यानुसार, ‘टीझर पाहिल्यानंतर लोकांकडून कमेंट येत आहेत की, त्यांना यातून ‘केजीएफ’चा फील येत आहे. त्याची बहुतेक तांत्रिक टीम फक्त ‘केजीएफ’ची आहे. त्याचे बजेट ९० कोटी रुपये आहे.
किच्चा-उपेंद्रचे पात्र आपापल्या भागातील मोठे गँगस्टर
‘कब्जा’ची कथा वेगळी आहे. देश स्वातंत्र्य झाला होता. ही त्या वेळेची कथा. तेव्हा देशात शेकडो राजे-महाराजे होते. आमचे पात्र वेगवेगळ्या राजवाड्यांवर कब्जा करण्याच्या तयारीत असतात. तेथे पुन्हा युद्ध होते. आमची कथा त्या वेळेच्या गँगस्टर्सवर आधारित आहे. यात आम्ही सिनेमॅटिक लिबर्टीचा फायदा घेतला आहे. किच्चा सुदीप आणि उपेंद्र रावचे पात्र आपापल्या भागातील गँगस्टर असतात. हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. स्वातंत्र्याच्या काळातील वातावरण दाखवणे आमच्यासाठी सोपे काम नव्हते.
‘कब्जा’देखील ‘केजीएफ’च्या दर्जाचा
आनंद पुढे सांगतात, ‘मुळात चित्रपटात, गुंडांना देशातील प्रत्येक यंत्रणा काबीज करायची होती, हे दाखवण्यात आले. उदाहरणार्थ, मुंबईत त्यांना सीमाशुल्क, पोलिस खाते, सरकारचे इतर विभाग आणि इथल्या स्थावर मालमत्तेवर कब्जा करायचा होता. जेणेकरून ते संपूर्ण शहरावर राज्य करू शकतील. या चित्रपटाचे नियोजन कोविड काळात करण्यात आले. यशसारख्या सुपरस्टारची उंचीही या चित्रपटामुळे उंचावली. त्याआधी त्याचे स्टारडम एका वेगळ्याच टप्प्यावर होते. इथे ‘कब्जा’ हाही त्याच उच्च दर्जाचा चित्रपट आहे.
‘सरकार ४’, ‘देसी बॉइज २’ आणि ‘ओमकारा’वर लेखनकाम सुरू
गुुजराती भाषेतील चित्रपटदेखील फायद्याचे ठरत असल्याने आनंद खुश आहे. त्यांच्या शब्दात..‘गेल्या काही वर्षांपासून प्रादेशिक भाषेतील चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या प्रकारे माझ्या ‘फक्त महिलाओ माटे’ या चित्रपटाला प्रतिसाद मिळाला. हा ३ कोटी बजेटचा चित्रपट होता, पण जवळपास २० कोटींचा व्यवसाय केला होता. मी इतर भाषेतही चित्रपटाची निर्मिती करत आहे. तामिल, तेलुगु आदी भाषेतही तेथील कलाकारांसोबत चर्चा करत आहे. हिंदीविषयी तर ‘सरकार ४’, ‘देसी बॉयज २’ आणि तिसरी ‘ओमकारा’चा रिमेक बनवणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.