आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑस्करमध्ये दोन श्रेणींत ऑस्कर पुरस्कार मिळाल्याने कला क्षेत्रात देशाचा मान आणखी वाढला. पुरस्कार मिळाल्यानंतर देशात उत्सवी वातावरण आहे. हा सोहळा देशासाठी आनंदाचा क्षण घेऊन आला. अॉस्कर पुरस्कारांत देशाच्या प्रतिनिधित्वाचा विषय येतो तेव्हा यात ९४ वर्षांच्या इतिहासात भारतीय चित्रपट निर्माते, चित्रपटांना कमी महत्त्व मिळाले. {नाटू-नाटू गाण्याने सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग श्रेणीत पुरस्कार जिंकला. प्रेम रक्षित यांनी याचे नृत्य दिग्दर्शन केले होते. यासाठी त्यांनी ११० स्टेप्स तयार केल्या होत्या. त्याच्या चित्रीकरणासाठी २० दिवस लागले.
ऑस्कर १९२९ मध्ये सुरू... ऑस्कर पुरस्काराची सुरुवात १९२९ मध्ये झाली. ३ हजारांहून जास्त अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, सिनेमॅटोग्राफर, कॉश्च्युम डिझायनरला ऑस्कर मिळाला आहे.
{१९२७ मध्ये डिझाइन केला पुरस्कार. एमजीएम स्टुडिओ आर्टचे डायरेक्टर केड्रिक गिबोन्स यांची निर्मिती आहे. {६२ वर्षांपूर्वी रेड कार्पेटची प्रथा सुरू झाली हाेती. या वेळी समारंभात स्टार्सनी शॅम्पेन कलरच्या कार्पेटवर एंट्री घेतली.
भारतीय मूल्ये माहीत नसल्याने मदर इंडिया निसटला {ऑस्करसाठी प्रचारही करावा लागतो. भारत सरकार आणि चित्रपट उद्योगाला हे माहीत नव्हते की, अन्य देश आपल्या चित्रपटाची सांस्कृतिक पार्श्वभूमी स्पष्ट करण्यासाठी किती परिश्रम घेत असतात. मदर इंडिया यामुळे मागे पडला. अंतिम फेरीपर्यंत चित्रपटांबाबत मतदान झाले. शेवटी इटलीचा चित्रपट नाइट्स ऑफ कॅरेबियाने एका मताने बाजी मारली. यामागे असे मानले जाते की, परीक्षकांना भारतीय मूल्ये समजली नव्हती. ज्युरींना वाटले होते की, पती घर सोडून गेल्यानंतर नायिका राधाने(नर्गिस दत्त) सावकाराचा प्रस्ताव का मान्य केला नाही? तो भला माणूस आहे.
वेगवेगळ्या श्रेणींत आपणास १८ नामांकने वर्ष चित्रपट श्रेणी 1958 मदर इंडिया विदेशी भाषा चित्रपट 1961 द क्रिएशन ऑफ वुमन शॉर्ट सब्जेक्ट 1969 द हाउस दॅट आनंद बुल्ट डॉक्युमेंट्री 1978 बिड गेम अॅनिमेटेड शॉर्ट 1979 एन एन्काउंटर विथ फेसेस डॉक्युमेंट्री 1983 गांधी ओरिजनल स्कोअर 1987 अ रूम विथ अ व्ह्यू बेस्ट पिक्चर 1989 सलाम बॉम्बे! फॉरेन लँग्वेज फिल्म 1993 हावर्ड्स अँड बेस्ट पिक्चर 1994 द रिमेन्स ऑफ द डे बेस्ट पिक्चर 2002 लगान फॉरेन लँग्वेज फिल्म 2005 लिटिल टेररिस्ट शॉर्ट सब्जेक्ट 2009 स्लम डॉग मिलिअनर ओरििनल साँग 2011 127 आवर्स ओरििनल साँग 2011 127 आवर्स ओरििनल साँग 2013 लाइफ ऑफ पाय ओरििनल साँग 2022 रायटिंग विथ फायर डॉक्युमेंट्री 2023 ऑल द ब्रीथ्स डॉक्युमेंट्री
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.