आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'RRR' चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 2008 मध्ये 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील 'जय हो' या गाण्यासाठी एआर रहमान यांना शेवटच्या वेळी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर जिंकला होता. 15 वर्षांनंतर भारताला हा पुरस्कार मिळाला आहे.
'जय हो' या गाण्याला ऑस्कर मिळाला होता, परंतू ती ब्रिटिश फिल्म होती. अशा परिस्थितीत भारतीय चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याला ऑस्कर मिळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. जे हिंदी चित्रपटातील गाणे आहे. हे गाणे जूनियर एनटीआर आणि रामचरण यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. ज्यांचे हुक स्टेप कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनी 110 चालींमध्ये तयार केले होते. या गाण्याला आधीच 'गोल्डन ग्लोब' पुरस्कार मिळाला आहे. गोल्डन ग्लोब जिंकणारे हे पहिले भारतीय आणि आशियाई गाणे आहे.
हे गाणे बनवण्याची कथा खूप रंजक आहे. ऑ,स्कर मिळालेले संगीतकार एमएम कीरवानी एकेकाळी अकाली मृत्यूच्या भीतीने संन्यासी म्हणून जगले होते. तर दुसरीकडे ज्या गाण्यावर जगभरातील लोक नाचत आहेत, त्या गाण्याच्या स्टेप्स बनवणारे कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
नाटू-नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर या गाण्याच्या निर्मिंत कथा आणि त्यासंबंधित काही मनोरंजक गोष्टी देखील जाणून घेऊया...
20 गाणी लिहिली होती, त्यापैकी नाटू-नाटूची RRR साठी निवड
चित्रपटातील नाटू-नाटू हे गाणे मैत्रीवर आधारित आहे. हे गाणे बनवण्यासाठी 19 महिने लागले. संगीतकार एमएम कीरवाणी यांनी या चित्रपटासाठी 20 गाणी लिहिली होती, परंतु त्या 20 गाण्यांपैकी नाटू-नाटूला अंतिम स्वरूप देण्यात आले. चित्रपट निर्मितीशी संबंधित लोकांच्या ओपिनियनच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. 90% गाणे फक्त अर्ध्या दिवसात पूर्ण झाले. उर्वरित पूर्ण करण्यासाठी 19 महिने लागले.
कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनी गाण्यासाठी स्टेप्स तयार केल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांना दोन मित्र एकत्र पार पाडू शकतील अशा स्टेप्स हव्या होत्या, पण स्टेप्स इतक्या क्लिष्ट नसाव्यात की इतर त्यांची कॉपी करू शकत नाहीत. गाण्याचे हुक स्टेप करण्यासाठी कोरिओग्राफरने 110 चाली तयार केल्या.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या पॅलेसमध्ये नाटू-नाटू झाली होती शूटींग
हे गाणे तयार झाल्यानंतर, ते ऑगस्ट 2021 मध्ये युक्रेनमधील कीव येथील राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या मारिन्स्की पॅलेसमध्ये शूट करण्यात आले. संपूर्ण गाणे कीवमध्ये 15 दिवसांत शूट करण्यात आले, ज्यामध्ये 50 बॅकग्राउंड डान्सर्स आणि सुमारे 400 ज्युनिअर कलाकारांचा समावेश होता.
नाटू-नाटू हे तेलगू गाणे आहे. तथापि त्याचे हिंदीत भाषांतर नाचो नाचो असे करण्यात आले. हे गाणे तामिळमध्ये नट्टू-कूथू, कन्नडमध्ये हाली नाट्टू आणि मल्याळममध्ये करिंथॉल या शीर्षकासह रिलीज करण्यात आले.
रिलीज होताच या गाण्याने अनेक रेकॉर्ड केले
नाटू नाटू हे गाणे 10 नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज झाले. त्याची तामिळ आवृत्ती रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत यूट्यूबवर 17 दशलक्ष व्ह्यूज मिळाले. त्याचवेळी, सर्व 5 भाषांमध्ये त्याचे एकूण व्यूव्हर्स 35 दशलक्ष होते. 1 दशलक्ष लाईक्स ओलांडणारे ते पहिले तेलुगू गाणे होते. सध्या फक्त हिंदी आवृत्तीला यूट्यूबवर 265 दशलक्ष व्ह्यूज आणि 2.5 दशलक्ष लाईक्स आहेत.
गाण्याचे कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनी एकदा आत्महत्येचा केला प्रयत्न
नाटू-नाटू गाण्याचे कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांचे वडील एकेकाळी हिरे व्यापारी होते. 1993 मध्ये कौटुंबिक मतभेदांमुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. कुटुंब इतके गरीब झाले होते की, वडील चित्रपटांमध्ये नृत्य सहाय्यक बनले. आणि प्रेम एका शिंप्याच्या दुकानात काम करू लागला. एके दिवशी गरिबीला कंटाळून प्रेम आत्महत्या करण्यासाठी चेन्नईच्या मरीना बीचवर गेला. आत्महत्या केल्यावर डान्स फेडरेशनचे लोक कुटुंबाला 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करतील, असा विचार त्यांनी केला.
आत्महत्येपूर्वी प्रेमला समजले की, समुद्रकिनारी पोहोचण्यासाठी त्याने वापरलेली सायकल ही उसनी घेतली होती. तो असाच मेला तर सायकलमुळे कुटुंबाला त्रास होईल. असा विचार करून तो सायकल ठेवण्यासाठी घरी आला. घरी येताच त्यांना वडिलांचा फोन आला की प्रेमला एका चित्रपटात डान्स कलाकार म्हणून काम मिळाले आहे. प्रेम यांनी नोकरी मिळताच आत्महत्येचा विचार सोडून दिला.
विद्यार्थी चित्रपटासाठी प्रथम प्रेम यांनी नृत्यदिग्दर्शन केले. ते गाणे पाहून राजामौली इतके खूश झाले की, त्यांनी कोरिओग्राफरला कळवले. गाण्याचे नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षित असल्याची माहिती होताच राजामौली यांनी स्वत: त्यांना बोलावून घेतले. विचारले की, तुम्ही मुलांना नृत्य शिकवू शकता का? यानंतर राजामौली यांनी त्यांना छत्रपती चित्रपटात कोरिओग्राफर म्हणून काम दिले. ज्युनियर एनटीआर या चित्रपटातूनच स्टार झाला. त्याचबरोबर या चित्रपटातून प्रेम रक्षितलाही ओळख मिळाली.
अकाली मृत्यूच्या भीतीने दीड महिना कुटुंबापासून दूर राहिले
नाटू- नाटू गाण्याचे संगीतकार एम.एम. कीरवाणी यांना यापूर्वीच RRR मधील नाटू नाटू गाण्यासाठी 'गोल्डन ग्लोब' पुरस्कार मिळाला आहे. 'तू मिले दिल खिले', 'तुम आये तो आया मुझे याद गली में आज चाँद निकला' आणि 'जादू है नशा है' हे कीरवाणी यांनी रचलेले सदाबहार सूर आहेत. जे प्रेक्षकांच्या कानाला गेल्या कित्येक वर्षांपासून गोडवा देत आहेत. कीरवानी यांच्या आयुष्यातील संगीताचा प्रवास वयाच्या चौथ्या वर्षांपासून सुरू झाला. व्हायोलिन सुरू झाला. मध्यंतरी एक काळ असाही आला, जेव्हा त्यांनी आपले प्रसिद्ध झालेले नाव बदलून एमएम करीम केले. या नावाने त्यांनी संगीत देखील दिले.
त्याचे कारण, असे झाले की, त्यांची पत्नी एम. एम. श्रीवल्ली गरोदर होती. तेव्हा त्यांच्या गुरूंनी सांगितले की, कीरवाणी यांना अकाली मृत्यूचा धोका आहे. साधूप्रमाणे दीड वर्ष कुटुंबापासून दूर राहिले तरच हा धोका टळू शकतो. कीरवाणी यांनी गुरूंच्या आदेशाचे पालन केले. नाव बदलून गुरूंच्या सांगण्यावरूनच काम केले. कीरवानी यांनी मराकादमनी या टोपण नावाने तमिळ चित्रपटांसाठी संगीत दिले. ते ग्रह, नक्षत्र आणि शुभ, अशुभ भरपूर मानतात.
कितीही उशीर झाला तरी मुहूर्त पाहूनच गाडीतून खाली उतरतात
खाली उतरण्याची योग्य वेळ येईपर्यंत कीरवानी गाडीत बसेल राहतात. एवढेच नाही तर शुभ मुहूर्त पाहूनच ते कोणत्याही फंक्शनला जातात. त्यांनी तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे.
राजामौली यांचे 10 पैकी 10 चित्रपट हिट, त्यांनी पॅन इंडियाचा ट्रेंडही सुरू केला
RRR चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा 100% ट्रॅक रेकॉर्ड आहे, म्हणजेच त्यांनी बनवलेले 10 पैकी 10 चित्रपट हिट ठरले आहेत. त्यांनी बाहुबली, मक्की सारखे उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. त्याला 2015 मध्ये बाहुबली मधील पॅन इंडिया चित्रपट ट्रेंडिंगसाठी देखील श्रेय दिले जाते. एसएस राजामौली यांनी 2012 मध्ये आलेला मक्की चित्रपट बनवण्यासाठी स्वतः माशांवर संशोधन केले. त्याला बारकाईने समजावे म्हणून ते त्यांच्या फ्रीजमध्ये माश्या ठेवत असत.
RRR चित्रपटाशी संबंधित मनोरंजक किस्से
हे ही वाचा सविस्तर
LIVEऑस्कर पुरस्कार सोहळा:'नाटू-नाटू'ला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंन्गचा पुरस्कार; 'द एलिफंट व्हिस्पर्स' ठरली 'बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म'
95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातून सोमवारी सकाळीच एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय चित्रपट RRR मधील 'नाटू-नाटू' गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला. यापूर्वी या गाण्याला 'गोल्डन ग्लोब' पुरस्कार मिळाला होता. भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे भारतीय चित्रपट 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.