आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • OTT Platform Doubles In A Year And A Half, Indians Ahead In Original Content; Netflix, Amazon Prime Behind Indian Platforms

मनोरंजन:दीड वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म दुप्पट, ओरिजिनल कंटेंटमध्ये भारतीय पुढे; नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम भारतीय प्लॅटफॉर्म्सच्या मागे

मनीषा भल्ला | मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओरिजिनल कंटेंटमध्ये असे पुढे जाताहेत भारतीय ओटीटी

देशातील करमणूक क्षेत्र‌ वेगाने वाढत आहे. २०२३ पर्यंत ओटीटी इंडस्ट्रीत ४५% वाढ होण्याची शक्यता आहे. देशात काही काळ अॅमेझॉन व नेटफ्लिक्ससारख्या विदेशी प्लॅटफॉर्म्सचा दबदबा होता. मात्र, सध्या ओरिजिनल कंटेंटमध्ये भारतीय प्लॅटफॉर्मने त्यांना तगडे आव्हान दिले आहे. काही भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्म तर यांच्या पुढे आहेत. लेट्सओटीटीग्लोबल डॉट कॉमच्या संपादक डॉ. सुनीताकुमार सांगतात, भारतात सध्या ८० पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत. दीड वर्षात यात दुप्पट वाढ झाली. दक्षिणेतील चित्रपट निर्माता सी. व्ही. कुमार यांनीही रिगल टॉकीज नावाने प्लॅटफॉर्म सुरू केला आहे, तर यशराज फिल्म्सही लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे.

असा आहे स्वदेशी-विदेशी सामना

फिल्म-ओटीटी ट्रेड अॅनालिस्ट गिरीश वानखेडे सांगतात, नुकतेच डिस्ने हॉटस्टारवर आलेले सडक-२, खुदा हाफिज चित्रपट जोरदार आपटले. नेटफलिक्सच्या मिसेस सिरियल किलर, घोस्ट सिरीजवरही टीका झाली. अॅमेझॉन प्राइमवर आलेल्या पेंग्विन व लॉकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली, तर भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअवर आलेल्या ‘एक थी बेगम’ आणि ‘आश्रम’ ने काही दिवसांतच विक्रम नोंदवला. इतर ओटीटीवरही चांगला कंटेंट आला.

ओरिजिनल कंटेंटमध्ये असे पुढे जाताहेत भारतीय ओटीटी

> नेटफ्लिक्स 15 सिरीज

> अॅमेझॉन प्राइम 19 सिरीज

> एरॉस नाऊ 15 सिरीज

> झी-5 80 सिरीज

> ऑल्ट बालाजी 64 सिरीज

> हंगामा 14 सिरीज

> एमएक्स प्लेयर 60 सिरीज

> सन एनएक्सटी 390 सिरीज

> हॉयचॉय 50 सिरीज

बातम्या आणखी आहेत...