आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरंजन:थेट लोकेशनवरच शूटिंग करण्याचा ओटीटीत ट्रेंड, कथानकांमध्ये अधिक जिवंतपणा यावा म्हणून त्यातील स्थळांची चित्रीकरणासाठी निवड

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात नेटफ्लिक्स, हॉटस्टार, सोनी लिव्ह यांसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आजच्या युगात मनोरंजनाचे सर्वात लोकप्रिय माध्यम ठरले आहेत. या माध्यमांवर दाखवले जाणारे चित्रपट आणि वेब सिरीज यांचे कथानक हे त्यांच्या लोकप्रियतेचे मोठे कारण ठरले आहे. हे चित्रपट आणि मालिकांमधील कथा अगदी खरीखुरी वाटावी यासाठी त्यांचे चित्रीकरण प्रत्यक्ष त्या-त्या भागातील स्थळांवरच आता केले जाऊ लागले आहे. लखनऊत चित्रित करण्यात आलेला ‘पगलॅट’असो की, लेहमध्ये चित्रीकरण झालेला ‘बार्ड ऑफ ब्लड’ किंवा मग कोलकात्यात तयार झालेली ‘रे’... मालिकेची कथा अगदी खऱ्या वाटाव्यात यासाठी प्रत्यक्ष मालिकांमध्ये नमूद स्थळांवर चित्रीत करण्यात आल्या आहेत. ‘पगलॅट’चे दिग्दर्शक उमेश बिष्ट यांनी सांगितले की,‘या चित्रपटाची सुरुवात तरुण विधवेच्या कथेने होते. संध्या एका छोट्या शहरातील नागरिक आहे. मग आम्ही या स्थळांचा शोध सुरू केला. तो लखनऊचा श्रीवास्तव टोला आणि तेथील ‘शांतिकुंज’मध्ये जाऊन थांबला. तेथील इमारती, रस्ते या स्थळाला अद्वितीय बनवतात.’ रविना टंडनच्या ‘अरण्यक’ या वेबसिरीजचे शूटिंग हिमालयात होत आहे, तर ‘ये काली काली आंखें’या सिरीजचे चित्रीकरण लेह, ओंकारेश्वर यांसारख्या ठिकाणी झाले.

कथेत प्राण ओततात लोकेशन... नंतर तेच पात्रही होतात
महान चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जीवनावर आधारित नेटफ्लिक्सच्या ‘रे’ या साहित्यविषयक मालिकेचा उल्लेख करत लेखक सायंतन मुखर्जी म्हणतात की, एखाद्या नर्तकासाठी जसा मंच ही पहिली गरज असते त्याचप्रमाणे कथेसाठी लोकेशन. जेव्हा तुम्ही योग्य स्थळी चित्रीकरण करता तेव्हा कथा जिवंत होते, खरीखुरी वाटते. ‘रे’मधील चारही कथांचे वैशिष्ट्य हेच आहे की, त्यात लोकेशन हेच एक पात्र आहे. ‘बहुरूपिया’त के. के. मेननला पाहिले तर तो कोलकात्याचे प्रतिनिधित्व करत असल्याचे वाटते. कोलकाता शहर चित्रपटातील पात्र झाले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कौशिक गांगुली यांच्या ‘मनोहर पांडेय’ या पहिल्या हिंदी चित्रपटाचे शूटिंग कोलकात्याच्या कुम्हार टोलासहित अनेक ठिकाणी झाले. चित्रपटाचे लेखक दुर्गेश सिंह यांनी सांगितले की, कथा लिहिताना स्थळ निश्चित होते. त्यामुळे कथा खरी वाटावी यासाठी चित्रीकरण प्रत्यक्ष स्थळावरच करण्याची प्रथा वाढली आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या तापसी पन्नू व विक्रांत मेसी यांसारख्या कलावंतांच्या ‘हसीन दिलरुबा’चे चित्रीकरण यूपीत झाले. जिमी शेरगिलच्या ‘चूना’चे शूटिंगही यूपीच्या काही लहान शहरांत होत आहे.

बातम्या आणखी आहेत...