आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंकज त्रिपाठी त्यांच्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेब सिरीजच्या नवीन सीझनसह पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. माधव मिश्राच्या भूमिकेत पंकज आपल्या जुन्या शैलीत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. नुकताच या मालिकेच्या तिसऱ्या सीझनचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सुमारे ३४ सेकंदांच्या टीझरमध्ये पंकज पुन्हा एकदा त्याच्या जुन्या विनोदी शैलीतील वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. तो पाहून दिसते की, मालिकेत तो त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण खटला लढण्यास तयार आहे.
रोहन सिप्पी दिग्दर्शित ही मालिका हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. टीझरमध्ये पंकजही ‘विजय तुझा नसावा ना माझा, विजय फक्त न्यायाचा असावा’ असे म्हणतानाही ऐकायला मिळत आहे. याच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय पंकज लवकरच ‘मिर्झापूर ३’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.