आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटांमधील कमाईच्या बाबतीत आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. बॉक्स ऑफिसच्या अहवालानुसार, पठाणने केवळ 11 दिवसांत 386.50 कोटी कमावले आहेत. या दिवसांमध्ये दंगलने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर केवळ 374.43 कोटींची कमाई केली होती.
एकूण हिंदीमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये बाहुबली-2 आणि केजीएफ-२ हे दोनच चित्रपट पठाणच्या पुढे आहेत. दोन्हीच्या हिंदी आवृत्त्यांचे कलेक्शन अनुक्रमे 435.33 कोटी आणि 510.99 कोटी रुपये आहे. तमिळ आणि तेलुगु भाषेतील आकडे जोडले तर पठाणची एकूण कमाई सद्या 400 कोटींच्या पुढे गेली आहे. त्याच वेळी, जगभरातील कलेक्शन 729 कोटींवर पोहोचले आहे.
जगभरात सर्वाधिक कलेक्शन करणाऱ्या चित्रपटांत पठाणची एंट्री मुळात हिंदी भाषेत बनलेल्या चित्रपटांमध्ये दंगलचे जगभरात सर्वाधिक 2,024 कोटींचे कलेक्शन होते. दुस-या क्रमांकावर सलमान खानचा चित्रपट बजरंगी भाईजान होता, ज्याने जगभरात 969.06 कोटींची कमाई केली. आमिर खानच्या 'सिक्रेट सुपरस्टार' चित्रपटाने 966.86 कोटींची कमाई केली, तर त्याच्या आणखी एका चित्रपटाने 854 कोटींची कमाई केली. आता या यादीत पठाणची ७२९ कोटींसह एंट्री झाली आहे.
सर्वात जलद 300 कोटी कमावणारा चित्रपट पठाण
पठाण हा बॉलिवूडमध्ये सर्वात जलद 300 कोटींची कमाई करणारा चित्रपट आहे. पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने 318.50 कोटींची कमाई करून विक्रम केला आहे. यापूर्वी, KGF-2 च्या हिंदी आवृत्तीने पहिल्या आठवड्यात सर्वाधिक 268.63 कोटी कमावले होते. त्याचबरोबर बाहुबली-2 चित्रपट 247 कोटींच्या कमाईसह दुसऱ्या क्रमांकावर होता.
पठाणने पहिल्याच दिवशी केला हा विक्रम
पठाणने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 55 कोटींची बंपर ओपनिंग केली होती. यापूर्वी हा विक्रम KGF 2 च्या नावावर होता, ज्याच्या हिंदी आवृत्तीने पहिल्या दिवशी 53.95 कोटी कमावले होते. 'अॅव्हेंजर्स एंडगेम' या हॉलिवूड चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 53.35 कोटींची कमाई केली आहे. पठाणने हे सर्व रेकॉर्ड रिलीज करून मोडीत काढले आहेत.
पठाणचे दिवसानुसार बॉक्स ऑफिस कलेक्शन..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.