आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुशर्रफांच्या भेटीसाठी राणी मुखर्जीला होते खास निमंत्रण:संजय दत्तने मुशर्रफांची भेट घेतल्यावर झाला होता ट्रोल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी दुबईत निधन झाले. त्यांचा काही वर्षांपूर्वी भारत दौरा झाला होता. तेव्हा त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत खास भेट घेतली होती. राणी ही बॉलिवूडमधील एकमेव स्टार होती जीची भेट घेण्याची इच्छा मुशर्रफ यांनी व्यक्त केली. नंतरच्या काळात संजय दत्त आणि मुशर्रफ यांची भेट झाली. मात्र, या भेटीनंतर संजय दत्तला ट्रोल करण्यात आले होते.

मुशर्रफ आणि बॉलिवूड स्टार्सचे कनेक्शन चर्चेत
मुशर्रफ आणि बॉलिवूड स्टार्सचे कनेक्शन अनेकदा चर्चेत होते. मुशर्रफ यांचे संजय दत्त आणि मिका सिंग यांच्याशी असलेले कनेक्शन ट्रोल झाले होते. त्याच राणी मुखर्जीची घेतली भेट देखील मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. पाकिस्तानचे राष्ट्रपती असताना मुशर्रफ 2005 मध्ये भारतात आले होते. त्यांनी राणी मुखर्जीला खास निमंत्रण पाठवले होते. या भेटीचा किस्सा खूप रंजक होता.

मुशर्रफ यांच्या पत्नी राणी मुखर्जीच्या फॅन होत्या
राणी मुखर्जीने या भेटीनंतर एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या भेटीचा दिवस चांगला आठवतो. 16 एप्रिल 2005. मुशर्रफ यांच्या भारत भेटीदरम्यान, ती एकमेव बॉलिवूड स्टार होती. जी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाचा भाग बनली होती. त्यात राणीला खास बोलावणे आले होते. त्याचे कारण होते की, परवेझ मुशर्रफ यांची पत्नी बेगम साहबा मुशर्रफ यांना राणी मुखर्जी बॉलीवूड स्टार्स म्हणून खूप आवडत असे. 'वीर जरा' चित्रपटात राणीने साकारलेली पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्याची भूमिका बेगम साहबा मुशर्रफ यांना खूप आवडली होती.

'वीर-झारा'मध्ये राणी मुखर्जीची कामगिरी आवडली होती
एका मुलाखतीत राणीने या भेटीबद्दल सांगितले की, 'माझ्यासाठी हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. सीमेच्या दोन्ही बाजूंचे आदरणीय लोक अतिशय सुसंस्कृत आणि डाउन टू अर्थ होते. राणी पुढे म्हणाली होती की, मला वाटते की 'ब्लॅक' आणि 'वीर-झारा'ने सीमेच्या दोन्ही बाजूंवर मोठा प्रभाव टाकला आहे. या पाहुण्यांच्या यादीचा एक भाग असण्याचा मला सन्मान वाटतो.

परराष्ट्र मंत्र्यांनी दिले होते पाकला येण्याचे निमंत्रण
या भेटीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री खुर्शीद मेहमूद कसुरी यांनीही राणी मुखर्जीला पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले होते. राणी म्हणाली की, ते म्हणाले की, मला जेव्हाही तिथे जायचे असेल तेव्हा माझ्या येण्याने त्यांना खूप आनंद होईल.

मुशर्रफ यांच्या भेटीसाठी संजय दत्त ट्रोल झाला

संजय दत्तने पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती मुशर्रफ यांची दुबईत भेट घेतली होती.
संजय दत्तने पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती मुशर्रफ यांची दुबईत भेट घेतली होती.

2022 मध्ये मुशर्रफसोबतचे संजय दत्तचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या दोघांची भेट दुबईत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या छायाचित्रांमध्ये मुशर्रफ व्हीलचेअरवर दिसत होते. 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध खूपच तणावपूर्ण झाले. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली. या बंदीनंतर झालेली ही भेट वादात सापडली होती. यासाठी संजय दत्तला सोशल मीडियावर ट्रोलला सामोरे जावे लागले होते.

मिका सिंग मुर्शरफांच्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात दिसला
2019 मध्ये, बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या मेहंदी कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसला. मिकाचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आणि त्याला खूप ट्रोल केले गेले.

बातम्या आणखी आहेत...