आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • 'Playing The Role Of A Princess Fulfilled My Heart's Desire, My Friends Call Me By This Name In Real Life'

दिगांगनासमवेत मैफल:‘प्रिन्सेसची भूमिका साकारल्याने मनातील इच्छा पूर्ण, खऱ्या आयुष्यात मित्र मला याच नावाने बोलावतात’

उमेश कुमार उपाध्याय। मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे ऐकलेय की सध्या तू इंदूरमध्ये ‘महल’चे चित्रीकरण करत आहेस? सध्या महलच्या चित्रीकरणामुळे व्यग्र आहे. एक ते दीड महिना इंदूर आणि मांडूमध्ये चित्रीकरण होणार आहे. काही भाग मांडूत चित्रित केला जाणार आहे. इंदूरमधील ऐतिहासिक स्थळांवर चित्रीकरण करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या महल नावाला न्याय देण्याचा प्रयत्न राहील. इंदूरमधील महालांहून उत्तम काय असू शकते? पहिल्यांदाच इंदूरमध्ये चित्रीकरण होत असल्याने आनंदी आहे. गेल्यावर्षी मी माझा वाढदिवसही येथेच साजरा केला होता. ‘महल’मध्ये तुझी भूमिका काय आहे? ‘महल’मध्ये मी एका राणीची भूमिका साकारत आहे. कथेबद्दल सांगितले तर मजाच निघून जाईल. राजकुमारीचे मुख्य पात्र साकारत आहे. त्याच्या अवतीभोवतीच कथा फिरते. खऱ्या आयुष्यातही मला प्रिन्सेस नावानेच हाक मारतात. त्यामुळे ही भूमिका आनंददायी आहे. मनातील एक इच्छा पूर्ण झाली.

‘फ्रायडे’, ‘जलेबी’, ‘रंगीला राजा’नंतर हिंदी चित्रपटांपासून अंतर का राखले ? मला दीर्घ काळापर्यंत काम करायचे नव्हते. मला काही खास प्रकारचे चित्रपट करायचे आहेत. जोपर्यंत त्या प्रकारची स्क्रिप्ट हाती येत नाही, तोपर्यंत अर्ध्या मनाने असे काही करणार नाही. सध्या मी ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगांव’ हा हिंदी चित्रपट साकारत आहे. त्यासाठी अतिशय उत्साहित आहे. हा एक ड्रामा वॉर चित्रपट आहे. हा या काळातील चित्रपट नाही. अभिमान वाटावा, अशा प्रकारच्या प्रोजेक्टचा भाग बनणे मला आवडते.

१०० वर्षांपूर्वीच्या कथेतील पात्र साकारणे किती आव्हानात्मक आहे ? पात्र समजून घेणे, त्या काळात जाणे-वावरणे, बसणे-उठणे आदी गोष्टी अतिशय आव्हानात्मक होत्या. मात्र या प्रकारचे अनेक चित्रपट मी पाहिले आहेत. त्यामुळे अशा चित्रपटाचा भाग बनणे हा सुखद योगायोग. एक प्रेक्षक म्हणूनही मला असे चित्रपट बघायला अतिशय आवडतात. त्यामुळे खास या प्रकारचा चित्रपट पाहण्याची गरजच पडली नाही, कारण मी असे खूपसारे चित्रपट पाहिले आहेत. प्रत्येक भूमिका वेगळी असते. राजकुमारीही १०० प्रकारची असते. मात्र त्या भूमिकेला योग्य न्याय द्यावा लागतो. मी पडद्यावर दिसेन तेव्हा दिगांगना म्हणून नव्हे, तर एक पात्र म्हणून ते प्रेक्षकांना आवडले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...