आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडी ड्रामा:‘थँक गॉड’चे पोस्टर्स प्रदर्शित, 21 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंहचा कॉमेडी ड्रामा ‘थँक गॉड’ चित्रपट २१ ऑक्टोबरला, दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. इंद्रकुमार त्याचे दिग्दर्शक आहेत. मेकर्सनी चित्रपटाचे पोस्टर्स प्रदर्शित केले आहेत. सोबत ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे. ९ सप्टेंबरला ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. सूत्रांनी सांगितले की, मेकर्सना चित्रपटाच्या यशाबाबत पूर्ण विश्वास आहे. तो प्रेक्षकांना नक्की आवडेल असे त्यांना वाटते. त्यामुळे एक महिना आधी त्यांनी ट्रेलर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. टी सिरीज, सोहम रॉकस्टार आणि आनंद पंडित मोशन पिक्चर्ससह मारुती इंटरनॅशनलने चित्रपटाची निर्मिती केली आहे. बॉक्स ऑफिसवर अक्षयकुमारच्या ‘राम सेतू’शी त्याचा सामना होणार आहे. चित्रपटात श्रीलंकन गायिका रॅपर योहानी ‘मानिके मगे हिथे’चे हिंदी व्हर्जन गाणार आहे. त्यावर नुरा फतेही नृत्य करताना दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...