आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Fir Demanded Against Prakash Raj; Prakash Raj Photo Controversy | Insulting Hindi | Tamil Nadu | Prakash Raj

प्रकाश राज यांच्यावर FIR ची मागणी:हिंदीचा अपमान केल्याचा आरोप, प्रकाश म्हणाले- हिंदी लादली तर आम्ही असेच आंदोलन करू

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतेच सुप्रीम कोर्टाचे वकील शशांक शेखर झा यांनी त्यांच्या ट्विटद्वारे तामिळनाडू पोलिसांना टॅग केले. त्यात त्यांनी लिहले की, तुम्ही प्रकाश राज यांच्यावर गुन्हा दाखल केला. FIR केला ?

सोबतच शेखर झा यांनी एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये प्रकाश राज हे काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहेत. त्यांच्या टी-शर्टवर लिहिले आहे की, मला हिंदी येत नाही. मला हिंदी येत नाही, जा..! यावरून आता गदारोळ सुरू झाला आहे.

वकील शशांक शेखर झा यांनी या ट्विटद्वारे FIRची मागणी केली.
वकील शशांक शेखर झा यांनी या ट्विटद्वारे FIRची मागणी केली.

उत्तरात प्रकाश राज म्हणाले- तुम्ही आमच्या भाषेचा अपमान केला तर आम्ही असाच विरोध करू

वकील शशांक शेखर यांच्या या ट्विटला रिट्विट करत प्रकाश राज यांनी लिहिले - माझी कन्नड ही मूळ भाषा आहे. जर तुम्ही तिचा अपमान केला. त्याचा अनादर करत असाल तसेच तुमची भाषा लादत असाल तर असाच विरोध करत राहू. तुम्ही काय मला धमकावत आहात का? असा प्रश्नच उपस्थित केला.

प्रकाश राज यांनी इंग्रजी आणि कन्नड अशा दोन्ही भाषेत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश राज यांनी इंग्रजी आणि कन्नड अशा दोन्ही भाषेत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जाणून घ्या- काय आहे संपूर्ण प्रकरण
2020 च्या आसपासची घटना आहे. त्या काळात बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीत शीतयुद्ध सुरू होते. भाषांबाबत लोक एकमेकांवर भाष्य करत होते. दरम्यान, 13 सप्टेंबर 2020 रोजी हिंदी दिनानिमित्त प्रकाश राज यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. त्या पोस्टमध्ये ते काळ्या रंगाच्या टी-शर्ट घातलेले दिसले. ज्यावर लिहिले होते- मला हिंदी येत नाही, जा...!

या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले – मला अनेक भाषा येतात. मी अनेक भाषांमध्ये काम करू शकतो.. पण माझे शिक्षण आहे. माझा विश्वास.. माझे मूळ.. माझी ताकद.. माझा अभिमान.. माझी मातृभाषा कन्नडच आहे.
या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले – मला अनेक भाषा येतात. मी अनेक भाषांमध्ये काम करू शकतो.. पण माझे शिक्षण आहे. माझा विश्वास.. माझे मूळ.. माझी ताकद.. माझा अभिमान.. माझी मातृभाषा कन्नडच आहे.

अनेक कलावंतांनी हिंदी भाषा लादण्यास विरोध केला
प्रकाश राज यांच्याशिवाय अनेक कलाकारांनी हिंदी भाषा लादण्यास विरोध केला होता. त्यात अभिनेता धनंजय आणि वशिष्ठ एन सिन्हा यांचाही समावेश होता. या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर हिंदी दिवसाविषयी त्यांचे मत व्यक्त केले.

हे ही वाचा

विवेक अग्निहोत्रींवर भडकले प्रकाश राज:म्हणाले - 'द कश्मीर फाइल्स' निकृष्ट दर्जाचा चित्रपट, इंटरनॅशनल ज्युरी चित्रपटावर थुंकले

दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटावरुन दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना खडे बोल सुनावले आहे. केरळमध्ये नुकत्याच झालेल्या मातृभूमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ लेटर्समध्ये प्रकाश राज उपस्थित होते. येथे त्यांनी द कश्मीर फाइल्सवर बरीच टीका केली आणि त्याला 'नॉनसेन्स' चित्रपट म्हटले. - येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...