आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्ये जाण्याच्या आपल्या निर्णयावर प्रथमच भाष्य केले आहे. डॅक्स शेफर्डच्या पॉडकास्ट शो आर्मचेअर एक्सपर्टमध्ये ती म्हणाली की, 'मी करिअरच्या शिखरावर असताना बॉलिवूड इंडस्ट्री सोडून सिंगिंग सुरू केली. स्वतःसाठी अमेरिकेत काम शोधण्यास सुरुवात केली.'
बॉलीवूडमध्ये मला मनासारखे काम मिळत नव्हते. एवढेच नाही तर इंडस्ट्रीतील राजकारणालाही मी कंटाळले होते. बॉलीवूडमध्ये मिळणाऱ्या कामामुळे मी आनंदी नव्हते, असे प्रियंका म्हणाली.
बॉलीवूडमध्ये मिळणाऱ्या कामावर समाधानी नव्हते
प्रियंका पुढे म्हणाली- देसी हिट्स म्युझिक लेबलच्या अंजली आचार्या यांनी मला एकदा एका म्युझिक व्हिडिओमध्ये पाहिले. त्यांनी मला कॉल केला. त्यावेळी मी सात खून माफचे शूटिंग करत होते. अंजलीने मला विचारले की अमेरिकेत संगीत करिअर करणार का? त्यावेळी मी बॉलिवूडमधून सुटका करण्याच्या प्रयत्नांत होते.
प्रियंका म्हणाली - मी येथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होते. मला इंडस्ट्रीत एका कोपऱ्यात ढकलले जात होते. लोक मला कास्ट करत नव्हते. माझ्या काही तक्रारी होत्या. मी त्या प्रकारचे खेळ खेळण्यात पटाईत नाही. मला राजकारणाचा कंटाळा आला होता. मला विश्रांतीची गरज होती.
अमेरिकेत संगीत क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली
प्रियांका म्हणाली- संगीतामुळे मला जगाचा दुसरा भाग पाहण्याची संधी मिळाली. बॉलीवूडमध्ये मला ज्या प्रकारचे चित्रपट मिळत होते, ते करण्याची माझी इच्छा नव्हती. तोपर्यंत मी इंडस्ट्रीत खूप काम केले होते. आता मला ते पुढे करावेसे वाटत नव्हते. त्यामुळे संगीताची ऑफर आल्यानंतर मी ताडकन - नरकात जा, मी अमेरिकेला चालले, अशी भावना व्यक्त केली.
प्रियंकाने 2012 साली तिच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. 'इन माय सिटी' हे तिचे पहिले गाणे होते. तिने एक्झॉटिक, आय कांट मेक यू लव्ह मी सारखी गाणीही गायली. 2015 मध्ये आलेल्या मेरी कॉम या चित्रपटात तिने तिचे पहिले बॉलिवूड गाणे गायले होते.
10 वर्षांतील प्रियंकाचे बॉलीवूड चित्रपट
चित्रपट | वर्ष |
द स्काय इज पिंक | 2019 |
जय गंगाजल | 2017 |
बाजीराव मस्तानी | 2015 |
दिल धडकने दो | 2015 |
मेरी कॉम | 2014 |
गुंडे | 2014 |
कृष | 2013 |
जंजीर | 2013 |
बर्फी | 2012 |
प्रियंकाचे हॉलिवूड प्रोजेक्ट्स
चित्रपट | वर्ष |
द व्हाइट टायगर | 2021 |
द मॅक्ट्रिक्स रिस्योरेशन | 2021 |
इज इंट रोमँटिक | 2019 |
अ किड लाइक जॅक | 2018 |
बे वॉच | 2017 |
क्वांटिको | 2015 |
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.