आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना हिने बुधवारी तिच्या बेबी शॉवरचा व्हिडिओ शेअर केला. यादरम्यान कपलचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. बेबी शॉवर सेरेमनीत उपासनाने पांढरा गाऊन घातला होता तर राम चरणदेखील पांढऱ्या रंगाच्या शर्ट पँटमध्ये दिसला.
टेडी थीमचा केक, व्हाइट थीम सजावट
उपासनाचा हा बेबी शॉवर सोहळा दुबईत पार पडला. या कार्यक्रमाची संपूर्ण थीम पांढऱ्या रंगाची होती. तर केक टेडी बिअर थीमचा होता. व्हिडिओमध्ये राम चरण आणि उपासना बीचवर खूप रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.
उपासनाने बहिणींचे मानले आभार
बेबी शॉवरच्या अनेक खास क्षणांचा व्हिडिओमध्ये समावेश आहे. उपासनाने लिहिले- 'मी सर्वांच्या प्रेमाची खूप आभारी आहे. सर्वोत्कृष्ट बेबी शॉवरची व्यवस्था केल्याबद्दल माझ्या लाडक्या बहिणी अनुष्पाला आणि सिंदूरी रेड्डी यांचे आभार.'
सेलेब्स आणि चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
कियारा अडवाणीने उपासनाच्या पोस्टवर कमेंट करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सोनाली बेंद्रेनेही पोस्टवर हार्ट इमोजी टाकला. याशिवाय एका यूजरने लिहिले- 'तुमचे फोटो खूप सुंदर आहेत, दोघांचेही खूप खूप अभिनंदन. राम चरण, आम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप आनंदी आहोत.' आणखी एका चाहत्याने लिहिले- 'तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन.'
डिसेंबर 2022 मध्ये दिली होती गुड न्यूज
उपासना आणि राम चरण यांनी डिसेंबर 2022 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली होती. राम चरणने लिहिले होते की, "श्री हनुमान यांच्या आशीर्वादाने हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, राम चरण व उपासना त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमानासाठी उत्सुक आहेत," असे त्याने पोस्टमध्ये म्हटले.
भारतातच होणार बाळाचा जन्म
रामचरण आणि उपासना यांच्या बाळाचा जन्म परदेशात होणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. अशात उपासनाने अमेरिकेत बाळाला जन्म देण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम लावत, त्यांचं बाळ भारतातच जन्माला येणार असल्याचे स्पष्ट केले होते. ट्वीट शेअर करत उपासना म्हणाली होती, "मी माझ्या देशात, भारतात माझ्या पहिल्या बाळाला जन्म देण्यासाठी खूपच उत्सुक आहे. अपोलो हॉस्पिटलमध्ये जागतिक स्तरावरील मेडिकल ओबी/ जीवायईएन टीम कार्यरत आहे. ज्यात डॉ सुमना मनोहर, डॉ रुमा सिन्हाके यांच्याबरोबरच गुड मॉर्निंग अमेरिका शोच्या डॉ जेनिफर एश्टनही आहेत. हा प्रवास आमच्यासाठी एक चांगला अनुभव घेऊन आला आहे. आम्ही आमच्या जीवनात या नव्या सुरुवातीची खूप आतुरतेने वाट पाहत होतो," असे ती म्हणाली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.