आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'बाहुबली' या गाजलेल्या चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबतीने आपल्या प्रकृतीबाबत एक धक्कादायक खुलासा केला. आपला उजवा डोळा काम करत नसून डाव्या डोळ्यानेच पाहू शकतो, अशी माहितीही त्याने दिली. किडनी ट्रान्सप्लांटबद्दलीह त्याने सांगितले. राणा डग्गुबतीची राणा नायडू ही नवीन वेबसिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशननिमित्त त्याने एक मुलाखत दिली.
माझा उजवा डोळा काम करत नाही. मी फक्त माझ्या डाव्या डोळ्याने पाहू शकतो. माझा उजवीकडे दिसणारा डोळा दुसऱ्याचा आहे. मृत्यूनंतर एका व्यक्तीने मला नेत्रदान केले. जर मी माझा डावा डोळा बंद केला तर मला काहीही दिसत नाही, अशीही माहिती त्याने दिली. शारीरिक समस्यांमुळे बरेच लोक तुटतात. कधीकधी या समस्या बऱ्या होतात. पण एक विचित्र जडपणा राहतो, असे राणाने सांगितले.
'किडनी ट्रान्सप्लांट झाले'
माझे माझे किडनीचंही ट्रान्सप्लांट झाले होते. त्यामुळे मला असे वाटते की मी जवळपास टर्मिनेटरच आहे. मी आता जिवंत आहे आणि मला फक्त चालत राहायचे आहे, हाच विचार मी करायचो.
2020 मध्ये झाले लग्न
राणाचे 2020 च्या ऑगस्ट महिन्यात मिहिका बजाजसोबत लग्न झाले. हैदराबाद येथील रामानायडू स्टुडिओत झालेल्या या लग्नाला फक्त 30 पाहुणे सहभागी झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजके लोक लग्नात हजर होते.
क्राइम ड्रामा ‘राणा नायडू’चा ट्रेलर रिलीज
नेटफ्लिक्सने ‘राणा नायडू’ या आगामी क्राइम सिरीजचा ट्रेलर रिलीज केला. राणा डग्गुबती आणि व्यंकटेश ही काका-पुतण्याची जोडी या मालिकेत दिसणार आहे. मात्र, या मालिकेत व्यंकटेश राणाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे.
ट्रेलरनुसार, राणाने राणा नायडूची भूमिका केली, तो सेलिब्रिटींच्या समस्या सोडवतो. जेव्हाही एखाद्या सेलिब्रिटीला काही अडचण येते तेव्हा तो राणाला फोन करतो. तथापि, राणाकडे स्वतःच्या समस्या सोडवण्याचा कोणताही मार्ग नाही आणि त्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याचे वडील नागा नायडू, जे तुरुंगातून परत आले आहेत. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.