आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता बनला मीम एक्सपर्ट:रणबीर कपूरने पत्नी आलिया भट्टची केली नक्कल; युजर्स म्हणाले - अरे भावा बायकोला तरी घाबर

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रणबीर कपूर सध्या आपल्या 'तू झुठी में मक्कर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. यातच रणबीर कपूरने आपण सोशल मीडियापासून लांब राहत असलो तरीही ट्रेंडिंग मीम्सबद्दल कायमच अपडेट असतो, असे सांगितले. यासह त्याने सोशल मीडियावर ट्रेंडिंग मीम्सची नक्कलही केली. यात अभिनेत्री आलिया भट्टच्या राझी चित्रपटातील मीमचा समावेश आहे.

जिओ सावनच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात त्याने 'तू झुठी मैं मक्कार' चित्रपटात रिलेशनशिप एक्स्पर्ट आहे. पण, खऱ्या आयुष्यात आपण मीम एक्स्पर्ट असल्याचे सांगितले. यावेळी रणबीर कपूरने आपल्या मीम टॅलेंटची चमक दाखवली. अनेक वेगवेगळ्या व्हायरल मीम्स त्याने रिक्रिएट केले आहेत. त्याने रजनीकांत, नाना पाटेकर आणि आलिया भट्टवरील मीमची नक्कल केली. तसेच आपण 'तू झुठी मैं मक्कार' चित्रपटातील रिलेशनशिप एक्स्पर्टपेक्षा खऱ्या आयुष्यात मोठा मीम एक्स्पर्ट असल्याचे सांगितले.

युजर्संनी दिला सल्ला
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी रणबीरचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर काही युजर्सने पत्नीची अशाप्रकारे कॉपी न करण्याचा सल्ला दिला. एका युजरने लिहिले- 'अरे भाऊ, तुझ्या बायकोला तरी घाबर. तर दुसर्‍या चाहत्याने लिहिले- शेवटचा मीम सर्वात चांगला होता.

बहिणीच्या शोमध्ये रणबीर कपूरने केली जबरदस्त धमाल-मस्ती

अभिनेत्री करिना कपूर खान लवकरच तिच्या टॉक शो 'व्हाट वुमन वॉन्ट'च्या नवीन एपिसोडसह परतणार आहे. शोच्या नवीन सीझनमध्ये रणबीर कपूर, कपिल शर्मा, शेफाली शाह यांच्यासह अनेक सेलिब्रिटी पाहुणे दिसणार आहेत. निर्मात्यांनी 10 मार्च रोजी चॅट शोचा टीझर रिलीज केला. यामध्ये शोमध्ये सहभागी होणार्‍या सर्व सेलिब्रिटींची झलक दिसत आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...