आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग सुरू आहे:‘अ‍ॅनिमल'च्या सेटवरून समोर आला रणबीरचा लूक

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर पुन्हा एकदा कामावर परतला आहे. तो लवकरच ‘अ‍ॅनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. सध्या रणबीर या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेता रक्ताने माखलेला दिसत आहे. चित्रपटाच्या सेटवरून हा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये रणबीरच्या चेहऱ्यावर मोठ्या मिशा आणि दाढी आहे. यामध्ये रणबीर एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे जो त्याच्या कौटुंबिक नात्यात अडकलेला आहे. या चित्रपटात रणबीर एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे, जो त्याच्या पात्राला सहाय्य करतो. या चित्रपटात रश्मिका मंदान्नाही दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही भूमिका आहेत. याआधी या चित्रपटाचे चित्रीकरण गुडगावमधील पतौडी हाऊसमध्ये झाले होते. जिथून अनिल आणि रणबीरचा लूक लीक झाला होता. याआधी चित्रपटाचे चित्रीकरण मनालीमध्ये सुरू झाले होते. याचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...