आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्काइव्हज:"इजाजत'च्या सेटवर रेखा, गुलजार आणि नसीरुद्दीन

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोटो “इजाजत’ चित्रपटाच्या सेटवरील आहे. हा चित्रपट ८ जुलै १९८७ मध्ये रिलीज झाला होता. यात नसीरुद्दीन शाह, रेखा आणि अनुराधा पटेल मुख्य भूमिकेत होते. दिग्दर्शक गुलजार जेव्हा नसीरुद्दीन यांना सीन समजून सांगत होते, तेव्हाचा हा फोटो आहे. तेव्हा “कतरा कतरा मिलता है...’ या गाण्याचे शूटिंग सुरू होते. गाण्याचे शूटिंग कर्नाटक आणि केरळमध्ये झाले आहे. गाणे आर. डी. बर्मन यांनी कंपोज केले होते. तर गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले हाेते. आशा भोसले यांनी हे गाणे गायले होते. आशाच्या आवाजात हे गाणे अगदी जुळून येत होते. पंचमने या गाण्यात सर्व सॉफ्ट इन्स्ट्रुमेंट्सचा अतिशय उत्तम वापर केला आहे. या चित्रपटासाठी गुलजार यांना फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कारही मिळाला होता. खरं तर, हा चित्रपट एका जोडप्याबद्दल आहे, ज्यांची रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये चुकून भेट होते आणि त्यानंतर दोघांचा भूतकाळ होता आणि ते वेगळे झाल्याचे प्रेक्षकांना कळते. या चित्रपटाला संगीत श्रेणीत दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले होते. गुलजार यांना गीतकार आणि आशा भोसले यांना पार्श्वगायनासाठी हे पुरस्कार मिळाले.

बातम्या आणखी आहेत...