आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाम प्रोजेक्ट:अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात दिसणार सैयामी खेर आणि गुलशन देवैया

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैयामी खेर आणि गुलशन देवैया लवकरच निर्माते अनुराग कश्यप यांच्या पुढच्या चित्रपटात दिसणार आहेत. मात्र चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. वृत्तानुसार अनुराग कश्यप निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. हैदराबादमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. सैयामी आणि गुलशन पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत, असे नाही. त्यापूर्वी त्यांनी अँथोलॉजी सिरीज ‘अनपॉज्ड सिझन १'मध्ये एकत्र काम केले होते. चित्रपटाबाबत सैयामीने सांगितले की..."हा एक रोमांचकारी प्रोजेक्ट आहे. तो दीर्घ काळापर्यंत लोकांसोबत राहील. गुलशन एक अद््भुत अभिनेता आहे. तो अतिशय रचनात्मक आणि बहुमुखी आहे.

आम्ही आधीही एकत्र काम केले आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा वेगळाच अनुभव असतो. दुर्दैवाने मी या प्रोजेक्टबाबत अधिक काही सांगू शकणार नाही.’ सैयामीच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास ती अॅक्सेल इंटरटेनमेंटच्या ‘अग्नी' चित्रपटात प्रतीक गांधीसह झळकणार आहे. तर गुलशन नुकताच जी ५ ची थ्रिलर वेब सिरीज ‘दुरंगा'त दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...