आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता सलमान खान आज कोलकाता येथे जाणार आहे. तो ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब मैदानावर दबंग द टूर रीलोडेड नावाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता हा शो सुरू होईल. याआधी सलमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानने मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती.
धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी ट्विट केले की, सलमान खान 13 मे रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरी भेट देणार आहे. त्यांची भेट घेतल्यानंतर ते ईस्ट बंगाल मैदानावर मेगा शो करणार आहेत. तब्बल 14 वर्षांनंतर अभिनेता कोलकात्यात येत आहे. त्याला नुकत्याच मिळालेल्या धमक्या पाहता कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांनीही स्वतंत्रपणे विशेष बंदोबस्त ठेवला आहे.
सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या
अलीकडच्या काळात सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यामुळे त्याचा कोलकाता दौरा लांबणीवर पडला होता. त्याचा हा कार्यक्रम आधीच ठरलेला होता, पण धमक्यांमुळे त्याचे येणे पुढे ढकलले जात होते. या कार्यक्रमात सलमानला ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबच्या अधिकाऱ्यांनी आमंत्रित केले आहे.
या शोमध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स सहभागी होणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कार्यक्रमात सलमान, जॅकलीन फर्नांडिस, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे, प्रभुदेवा, गुरु रंधावा यांच्याशिवाय बॉलिवूडचे अनेक स्टार्सही उपस्थित राहणार आहेत. सलमानने एक व्हिडिओ बनवून त्याच्या चाहत्यांना त्याच्या कोलकाता दौऱ्याची माहिती दिली होती. दबंग खानच्या या शोची तिकीट किंमत ६९९ ते ४००० रुपये ठेवण्यात आली आहे.
सलमान खानशी संबंधित या बातम्या तुम्हीही वाचा...
धमकी प्रकरण : सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, लूक आउट नोटीस जारी
सलमान खानला ईमेलद्वारे धमक्या आल्या होत्या. रोहित नावाच्या व्यक्तीने लॉरेन्स आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाने धमकीचा ईमेल पाठवला होता. सलमानच्या टीमला मिळालेल्या ईमेलमध्ये लिहिले होते की, जर तुमचा बॉस सलमानला हे प्रकरण बंद करायचे असेल तर त्याच्याशी बोला. अन्यथा, पुढच्या वेळी तुम्हाला सरळ धक्का बसेल. वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.