आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारा अली स्टारर:साराने पूर्ण केले ‘मर्डर मूव्ही’चे पहिले शेड्यूल

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारा अली खानने दिग्दर्शक होमी अदजानियासह आपला आगामी चित्रपट ‘मर्डर मुबारक’चे पहिले शेड्यूल गुरुवारी पूर्ण केले. ही माहिती होमीने सारासह सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून दिली. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले..., ‘पाहा दोन मुले, पहिले शेड्यूल पूर्ण केल्याबद्दल शाब्बाश...आता खरं काम सुरू हाेईल..’ तीच पोस्ट शेअर करत साराने उत्तर दिले, ‘विश्वास वाटत नाही पण हे काम पूर्ण झाले. तुमचा आशीर्वाद.’

नुकतेच साराने चित्रपट मर्डर मुबारकचे शूटिंग दिल्लीत सुरू केले होते. या चित्रपटात सारासोबत करिश्मा कपूरदेखील अभिनय करताना दिसणार आहे. नुकतेच करिश्माने चित्रपटाच्या सेटवरून क्लॅपरबोर्डदेखील शेअर केला आहे. इतर कामाबद्दल बोलायचे झाले तर सारा लवकरच ‘गॅसलाइट’ चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंग यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ३१ मार्च रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सारा विकी कौशलसोबत एका चित्रपटातही दिसणार आहे. ज्याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...