आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटायगर श्रॉफ ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्तीसोबत एक अॅक्शन चित्रपट करणार आहे. आता सारा अली खानदेखील या चित्रपटात काम करणार असल्याचे बोलले जात आहे. सूत्रानुसार, निर्माते या चित्रपटात टायगरसाठी एक नवीन जोडीदाराचा शोध घेत होते. त्यांचा हा शोध सारा अलीवर जाऊन थांबला. कारण सारा आणि टायगरची जोडी अजून आली नव्हती. चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनवर काम सुरू झाले आहे.
१० डिसेंबरपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. जॅकी भगनानी चित्रपटाच्या निर्मितीचे काम सांभाळणार आहेत. चित्रपटात दमदार अॅक्शन असेल. हा एका मिशनवर आधारत आहे. यासाठी जॅकी स्टंट टीमच्या सतत संपर्कात आहे. चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेचा शोध सुरू आहे. याचे शूटिंग भारत आणि यूरोपात होणार आहे. इतर कामाविषयी बोलायचं झालं तर सारा लवकरच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या व्यतिरिक्त ‘गॅसलाइट’ मध्येही दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.