आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेम्स बाँड कालवश:7 चित्रपटांत जेम्स बाँडची भूमिका साकारणारे सीन कॉनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन; झोपेतच घेतला जगाचा निरोप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीन कॉनेरी यांना 1988 मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला होता

जेम्स बॉन्ड नावाने प्रसिद्ध शॉन कॉनरी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. मुलगा जेसन कॉनरी यांनी निधनाची बातमी दिली. जेसन म्हणाले की, शॉन गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. रात्री झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. ऑगस्ट महिन्यात त्यांनी 90 वा वाढदिवस साजरा केला होता.

007 मालिकेच्या 7 चित्रपटांमध्ये दिसले

मोठ्या पडद्यावर जेम्स बाँडची भूमिका साकारणारे शॉन पहिला अभिनेता होते. त्यांनी 007 मालिकेतील 7 चित्रपटांत जेम्स बॉन्डची भूमिका निभावली होती. यामध्ये 'डॉक्टर नो', 'फ्रॉम रशिया विद लव', 'गोल्डफिंगर', 'थंडरबॉल','यू ओनली लिव ट्वाइस', 'डायमंड्स अरे फॉरएवर', 'नेवर से अगेन' इत्यादींचा समावेश आहे. सीन कॉनरी यांनी बॉन्ड सीरीजच्या चित्रपटांतून लोकप्रियता मिळाली.

40 वर्षांपर्यंत चित्रपटसृष्टीत सक्रिय राहणाऱ्या शॉन कॉनरी यांनी मरीन (1964), मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस (1974), द मैन हु वुल्ड बी किंग (1975), द नेम ऑफ़ द रोज (1986), हाईलैंडर(1986), इंडियाना जोन्स एंड द लास्ट क्रुसेड(1989), द हंट फॉर रेड अक्टूबर(1990), ड्रेगनहार्ट (1996), द रॉक (1996), एंड फाइंडिंग फोरेस्टर (2000) या चित्रपटांत देखील काम केले आहे.

1988 मध्ये ऑस्करवर नाव कोरले

1988 मध्ये 'द अनटचेबल्स' चित्रपटातील भूमिकेसाठी शॉन कॉनरी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी ऑस्करने गौरविण्यात आले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत दोन बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील जिंकले आहेत. 1999 मध्ये पीपल मासिकाने मॅन ऑफ सेंच्युरी देखील निवडले होते. याच मासिकाने त्यांना 1989 मध्ये सेक्सिएस्ट मॅन अलाइव्हचा पुरस्कार देखील दिला होता.