आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमँटिक ड्रामा:‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे काश्मीरमधील चित्रीकरण पूर्ण

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

करण जोहर सध्या आपल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाविषयी चर्चेत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे शूटिंग काश्मिरमध्ये सुरू आहे. दरम्यान, यातील फोटो आणि व्हिडिओदेखील समोर आले होते. आता चित्रपटाविषयी एक नवी माहिती समोर आली आहे. सूत्रानुसार, चित्रपटाच्या शूटिंगचे काश्मीर शेड्यूल पूर्ण झाले आहे. करणने ही माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझ्यावर परफॉर्मेंसवर जाऊ नका,माझ्या भावना समजून घ्या, सुंदर काश्मीरला अलविदा.’ या चित्रपटाद्वारे करण जोहर दीर्घकाळानंतर दिग्दर्शनाच्या दुनियेत परतणार आहे. हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेंद्रदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात शबाना आलियाच्या आजीच्या भूमिकेत तर जया रणवीरच्या आजीच्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...