आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Shruti Haasan Called The Comparison A Very Big Disease In The World, Spoke On Nepotism All This Does Not Work In South Industry.

मुलाखत:श्रुती हासन म्हणाली -  तुलना करणे हा जगातील सर्वात मोठा आजार आहे, आडनावामुळे काम मिळतही असेल; पण येथे स्वत:लाच तगून राहावे लागते

उमेशकुमार उपाध्याय. मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रुतीचा 'यारा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

दक्षिणेतील सुपरस्टार कमल हासन यांची मुलगी श्रुती हासनचा पुढील चित्रपट ‘यारा’ ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ‘दिव्य मराठी’ने श्रुतीशी हा चित्रपट आणि इंडस्ट्रीमधील घराणेशाहीवर चर्चा केली. या चर्चेतील काही प्रमुख मुद्दे :

  • तुम्ही सुपरस्टार कमल हासन यांच्या कन्या आहात, त्यामु‌ळे इंडस्ट्रीत तुलना नेहमीच केली जात असेल. स्वत:चा त्यापासून बचाव कसा केला?

तुलना करणे हा जगातील सर्वात मोठा आजार आहे. मम्मी-पापांशी माझी तुलना केली जाईल, हे तर मला सुरुवातीपासूनच माहीत होते. ‘लक’ या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी मला वाटत होते की, मी खूप कॉन्फिडंट आहे, पण आतून माझी परिस्थिती खूपच खराब होती. माझे आई-वडील त्यांच्या बालपणापासून अभिनय करत आहेत. त्यांनीही चुका केल्या असतील, पण तेव्हा कोणी तुलना केली असेल का? त्यांच्या शिकवणुकीमुळेच कालपरत्वे माझ्यात अभिनय कला आली. पापांशी माझी तुलना करण्यात आली तेव्हा माझी स्थिती खूप खराब झाली. आता मी माझे काम परिश्रमपूर्वक करते आणि खाली मान घालून निघून जाते. माझा हाच फंडा राहिला.

  • तुमची पृष्ठभूमी चित्रपटाची आहे. तुम्हालाही चित्रपट इंडस्ट्रीत घराणेशाहीचे किंवा गटबाजीचे फायदे झाले का?

चित्रपटात काम करणे माझ्यासाठी कठीण राहिले किंवा सोपे राहिले, असे मी कधीच म्हणत नाही. येथे नावामुळे दारे तर उघडतात, पण आत जाऊन राहणे, भटकंती करणे, संवाद साधणे हे आपल्यावर अवलंबून असते. येथे प्रत्येकाला खूप परिश्रम करून नाव कमवावे लागते. दुसरीकडे, दक्षिणेत हा याचा भाऊ आहे किंवा मुलगा आहे, हे मुळीच चालत नाही. तमिळ चित्रपटांत एखाद्या अभिनेत्याची मुलगी असणारी मी कदाचित दुसरी किंवा तिसरीच अभिनेत्री असेन. अर्थात माझ्यानंतर अनेक लोक आले. कोणाचे नातेवाईक असणारे लोक तेथे खूपच कमी आहेत. तमिळ इंडस्ट्रीत घराणेशाही खूपच कमी आहे.

  • ‘यारा’ या आगामी चित्रपटातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल?

माझी भूमिका मोठी आहे. मी सुकन्या हे पात्र सादर केले आहे. या पात्रामुळे कथेत अनेक नवे अँगल येतात. तिग्मांशू धूलियाच्या चित्रपटात नेहमीच महिला पात्रांची भूमिका खूपच वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यात खूप करून दाखवण्यासारखे असते. चित्रपटात माझी खूपच चांगली आणि महत्त्वाची आहे. मी माझ्या भूमिकेमुळे समाधानी आहे.

बातम्या आणखी आहेत...