आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन स्पायडरमॅनला शुभमन गिलचा आवाज:हिंदी, पंजाबीत डबिंग होणार, 2 जूनला होईल रिलीज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये मैदान गाजवल्यानंतर क्रिकेटपटू शुभमन गिल आता देसी स्पायडर मॅन पवित्र प्रभाकरच्या व्यक्तिरेखेला आपला आवाज देणार आहे. 2 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या अॅनिमेटेड चित्रपटासाठी गिल हिंदी आणि पंजाबी भाषेतून डबिंग करणार आहे.

स्पायडर-मॅनच्या या आवृत्तीमधील पात्रांना भारतीय टच दिसेल. या माध्यमातून भारतीय स्पायडर मॅन पवित्र प्रभाकर पदार्पण करणार आहे. इंग्रजीतून भारतीय अमेरिकन अभिनेता करण सोनी या पात्राला आपला आवाज देईल. तर हिंदी आणि पंजाबी भाषेसाठी शुभमन गिलची निवड झाली आहे. मार्व्हल कॉमिक्स या प्रसिद्ध अमेरिकन कॉमिक बुकमध्ये 2005 मध्ये एका छोट्या गावात राहणाऱ्या पवित्र प्रभाकर म्हणजेच भारतीय स्पायडर मॅनचा उल्लेख करण्यात आला होता.

आवाज दिल्याबद्दल शुभमनने व्यक्त केला आनंद, शेअर केला मजेशीर व्हिडिओ

​​​​​​​बहुतेक तरुणांप्रमाणे, शुभमन गिल स्पायडर-मॅन पाहत मोठा झाला आहे, म्हणून तो या पात्राला आपला आवाज देण्यासाठी खूप उत्सुक आहे. इंस्टाग्रामवर चित्रपटाशी संबंधित व्हिडिओ शेअर करताना शुभमनने लिहिले- 'शुभ मॅन आता स्पायडर-मॅन झाला आहे! स्पायडर-मॅनमधील भारतीय स्पायडर-मॅन पवित्र प्रभाकर: एक्रोस द स्पायडर-व्हर्ससाठी माझा आवाज देण्यासाठी मी उत्सुक आहे. ट्रेलर लवकरच प्रदर्शित होईल, अॅक्शन पाहण्यासाठी सज्ज व्हा.

घोषणेसोबतच शुभमनने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये अनेक लोक छताकडे पाहून शुभमन गिलला खाली उतरण्यास सांगतात. व्हिडिओच्या शेवटी शुभमन म्हणतो - चला तर मग सुरुवात करूया! क्रिकेटर असो वा सुपरहिरो, 'मोठ्या ताकदीसोबत मोठी जबाबदारी येते.'

ही घोषणा ऐकून चाहत्यांची उत्सुकता वाढली

व्हिडिओ समोर आल्यापासून चाहते शुभमन गिलच्या या प्रोजेक्टबद्दल खूप आनंदी आहेत. एका युझरने कमेंटमध्ये लिहिले - हा अप्रतिम अॅनिमेटेड चित्रपट पाहण्याचे आणखी एक कारण मिळाले. दुसर्‍या यूझरने लिहिले- 'सर, तुम्ही कोणत्या लाईनमध्ये आला आहात?' तिसर्‍या युझरने लिहिले - क्रिकेटचा स्पायडर मॅन', चौथ्या यूझरने लिहिले - तुमचे बेस्ट द्या, हे मोठे पात्र आहे. स्पायडी परत येण्यास तयार आहे. शुभमनचा हा व्हिडिओ अशा कमेंट्सनी भरलेला आहे. हे काम माझ्यासारख्या व्हॉईस ओव्हर कलाकाराला द्यायला हवे होते, असे अनेकांचे म्हणणे असले तरी.

भारतात, स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स 10 भाषांमधून थिएटरमध्ये प्रदर्शित होईल – इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, गुजराती, मराठी, बंगाली, कन्नड आणि मल्याळम.