आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निनावी प्रोजेक्ट:नंदमुरी बालकृष्णसह तेलुगु चित्रपटात दिसेल सोनाक्षी सिन्हा

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनाक्षी सिन्हाने नुकताच तिचा पहिला तेलुगु चित्रपट साईन केला आहे. माहितीनुसार, सोनाक्षी दक्षिणेतील अभिनेता नंदामुरी बालकृष्ण यांची भूमिका असलेल्या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच ती यासाठी हैदराबादलाही आली होती. अनिल रविपुडी याचे दिग्दर्शन करणार असून डिसेंबरमध्ये या चित्रपटाची घोषणा होणार आहे. सोनाक्षी तिच्या करिअरची या नव्या इनिंगसाठी पूर्णपणे तयार व उत्सुक आहे. नंदामुरी बालकृष्ण हे अभिनेता तसेच निर्माता आणि राजकारणी आहेत. सोनाक्षीने २०१४ मध्ये तमिळ अ‍ॅक्शन ड्रामा फिल्म ‘लिंगा'मधून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात सोनाक्षीने रजनीकांतसोबत काम केले. त्याच नावाने तो हिंदी आणि तेलगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला. ‘लिंगा'मध्ये सोनाक्षीने भारती नावाची भूमिका साकारली होती. तसेच सोनाक्षी लवकरच ‘ककुडा' या विनोदी भयपटात चित्रपटात दिसेल. या चित्रपटात रितेश देशमुख आणि साकिब सलीम देखील दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...