आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमँटिक गाणं रिलीज:‘टीडीएम’मधील  गाणीदेखील  लावताहेत वेड

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल बॉक्स ऑफिसवर गाण्यांमुळे चित्रपट हिट होतात असं काहीसं गणित दिसतंय. यातली बरीच गाणी ही रोमँटिक असल्याचं चित्र समोर आहे. सध्या सिनेविश्वात रोमँटिक गाण्यांची क्रेझ जरा जास्तच पाहायला मिळतेय. अशातच ‘टीडीएम’ या चित्रपटातील एका गाण्याने धुमाकूळच घातलाय. आता यांत भर घालायला या चित्रपटातील दुसरे रोमँटिक गाणं सज्ज झाले आहे. ‘मन झालं मल्हारी’ असं गाण्याचं नाव असून युवक युवतीच्या नात्याची गुंफण उलगडणार हे गाणं आहे. या गाण्यातून नायक नायिकेचा रोमँटिक अंदाज पाहणं लक्षवेधी ठरतय. प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचं विषय असला तरी प्रेयसी आणि प्रियकराची प्रेमाची व्याख्या ही इतर नात्यातील प्रेमापेक्षा काहीशी निराळीच असते, याच हुबेहूब वर्णन या गाण्यातून घडतंय. प्रेयसी आणि प्रियकराच एकमेकांवर असलेलं प्रेम अगदी अचूक हेरत या गाण्यातून मांडलंय. गाण्याच्या शब्दांमध्येच इतका जिव्हाळा आहे की आपसूक हे गाणं ओठावर रेंगाळतय. ‘टीडीएम’ चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं आज ट्रेंडिंग मध्ये आहेच आता ‘मन झालं मल्हारी’ हे गाणं ही प्रेक्षकांसमोर आलं असून रसिकांच्या दिलावर राज्य करतय. या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार वैभव शिरोळे याने पेलली आहे.