आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्शन ड्रामा:सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’मध्ये झाली दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची एंट्री

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या ‘पुष्पा २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता चित्रपटाविषयी एक लेटेस्ट अपडेट समोर आले आहे. बातम्यांनुसार, चित्रपटात दक्षिणेच्या एका सुंदर अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. सूत्रानुसार, या चित्रपटात साई पल्लवी मुख्य भूमिका साकारणार आहे. सूत्रानुसार, चित्रपटाच्या दुसऱ्या भागात राधिका म्हणजेच रश्मिका मंदानाही झळकणार आहे, मात्र अल्लुसोबत साई पल्लवीदेखील दिसणार आहे. ती यात पाहुण्या कलाकारांची भूमिका साकारणार आहे. एका आठवड्यात ती या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. ‘पुष्पा २’ मधील सईच्या भूमिकेबाबत निर्मात्यांकडून सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाद्वारे सई पहिल्यांदाच अल्लूसोबत एका चित्रपटात काम करताना दिसणार आहे. इतर कामाबद्दल बोलायचे झाले तर सईला मधू मंटेना यांच्या ‘रामायण’ चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आले आहे. या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारू शकते.

बातम्या आणखी आहेत...