आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्दर्शक एसएस राजामौली यांनी नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, जर त्यांनी महाभारतावर चित्रपट बनवला तर तो चित्रपट कसा असेल.
त्यांच्या बहिणीचे पती डॉ. ए.व्ही. गुरुवा रेड्डी यांच्याशी बोलताना राजामौली म्हणाले की, जर त्यांनी महाभारतावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला तर संपूर्ण महाभारत ते 10 वेगवेगळ्या भागांत चित्रित करतील.
महाभारत वाचायला एक वर्ष लागेल : राजामौली
ते म्हणाले- आपल्या देशात महाभारताच्या विविध आवृत्त्या आहेत. त्या सर्व वाचायला मला किमान एक वर्ष लागेल आणि जर मी महाभारतावर चित्रपट बनवला तर तो 10 भागांमध्ये असेल. महाभारतावर चित्रपट बनवायचा हा विचार माझ्या मनात आहे.
महाभारत चित्रीकरणासाठी मिळाली प्रत्येक शिकवण: राजामौली
जुन्या मुलाखतींमध्ये राजामौली यांनी महाकाव्यावर चित्रपट बनवणे हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले आहे. कार्यक्रमात राजामौली म्हणाले- मी जेव्हाही चित्रपट बनवतो तेव्हा मला असे वाटते की मी महाभारतावर चित्रपट बनवण्यासाठी हे सर्व शिकत आहे. काहीतरी मोठं करायचं असेल तर छोट्या स्टेप्समधून शिकणं खूप गरजेचं आहे. माझा प्रत्येक चित्रपट म्हणजे महाभारतावर चित्रपट बनवण्यासाठी उचललेले पाऊल आहे, एक छोटासा प्रयत्न.
तुम्ही माझे महाभारत यापूर्वी पाहिले नसेल, ऐकले नसेल: राजामौली
याआधी राम चरणसोबत झालेल्या संभाषणात राजामौली यांनी सांगितले होते की, त्यांच्या महाभारतातील साहित्य आणि पात्रे आज आपल्याला ज्या प्रकारे महाभारताची मांडणी आणि पात्रे माहित आहेत त्यापेक्षा पूर्णपणे भिन्न असतील. राजामौली म्हणाले होते - महाभारतातील माझी पात्रे मी ज्या पद्धतीने मांडणार आहे, तुम्ही यापूर्वी कुठेही पाहिली किंवा ऐकली नसेल.
महाभारताबाबत माझ्या मनातही अशीच दृष्टी आहे. मी तुम्हाला महाभारताची कथा माझ्या पद्धतीने सांगेन. ना कथा बदलेल, ना त्यातील पात्रे, पण ही पात्रे कशी सादर करायची आणि त्यांच्यातील नाते-भावना पडद्यावर कशी दाखवायची हे मला माहीत आहे.
राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे. सध्या राजामौली महेश बाबूसोबत त्यांच्या पुढच्या चित्रपटावर काम करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.