आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला आहे. बेस्ट ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येणार आहे. या इंटरनॅशनल अवॉर्ड फंक्शनमध्ये स्वत: एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीदरम्यान चित्रपटाच्या सिक्वेलची पुष्टी केली आहे.
एसएस राजामौली म्हणाले की, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपट जागतिक स्तरावर गाजल्यानंतर आम्हाला या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची कल्पना आली. यासाठी विविध कल्पना होत्या. परंतु त्यापैकी कशावरही मी समाधानी नव्हतो. काही आठवड्यांपूर्वी मी माझ्या वडिलांशी आणि माझ्या चुलत भावाशी याबद्दल चर्चा करत होतो. मात्र, स्क्रिप्ट पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यावर जास्त बोलू शकत नाही, पण आमचे काम सुरू आहे हे नक्की. ऑस्कर जिंकल्याने आता आरआरआर सिक्वेल स्क्रिप्टला वेग येईल.
नाटू नाटू या गाण्यानं लेडी गागा आणि री-रीच्या गाण्यांना मागे टाकलं आहे. अप्लॉज, होल्ड माय हँड, लिफ्ट मी अप आणि दिस इज ए लाइफ या गाण्यांना मागे टाकत 'नाटू नाटू' ने ऑस्कर पटकावला आहे. नाटू नाटू गाण्याने ऑस्कर जिंकणं ही भारतीय सिनेमासाठी खूप गर्वाची बाब आहे. नाटू नाटू हे गाणं अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. 2022मध्ये नाटूनाटू गाण्यानं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. नाटूनाटूची हुक स्टेप सोशल मीडियावर चांगलीच हिट झाली होती. नाटू नाटू या गाण्याला काही दिवसांआधीच गोल्डन ग्लोब अवॉर्ड देखील मिळाला.
ऑस्कर्समध्ये भारताची शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्म द एलिफेंट व्हिस्परर्सने अवॉर्ड जिंकून इतिहास रचलाय. प्रोड्यूसर गुनीत मोंगा याच्या या सिनेमाने द एलिफेंट व्हिस्परर्सने बेस्ट शॉर्ट डॉक्यूमेंट्रीचा अवॉर्ड जिंकला आहे. द एलिफेंट व्हिस्परर्सने ऑस्कर अवॉर्ड जिंकल्यानंतर गुनीत मोंगाने आनंद व्यक्त केला आहे.हा भारताचा पहिला ऑस्कर आहे, जो या कॅटेगरीत देण्यात आला आहे.
ऑस्करमध्ये प्रथमच भारताचा असा जलवा
सोमवारी सकाळी ऑस्कर सोहळ्याची अशी बातमी आली की पूर्ण देश 'नाटू-नाटू' करत आहे. यावेळी ऑस्कर पुरस्कारांत भारताला 3 नामांकने मिळाली आणि दीपिका पदुकोणला विशेष सादरकर्ती म्हणून बोलावण्यात आले होते. RRR चित्रपटातील 'नाटू-नाटू' गाण्याला सर्वोत्तम मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला. 'द एलिफंट व्हिस्परर्सला' सर्वोत्तम डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला. तथापि, डॉक्युमेंट्री फिचर फिल्म 'ऑल दॅट ब्रिथ्स' शर्यतीच्या बाहेर झाली. यावेळी ऑस्कर पुरस्कारांत आशियाई देशांच्या नामांकनाची खूप चर्चा आहे.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमधून जाणून घेऊया की ऑस्करपासून सहसा अस्पृश्य राहणाऱ्या आशियाई देशांना यावेळी बंपर नामांकन का मिळाले? ऑस्कर पुरस्कारांचा घटता प्रेक्षकवर्ग आणि रेटिंग वाढवण्याचा हा प्रयत्न आहे का? येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.