आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक चित्रपट:एस.एस. राजामौलींचा आगामी चित्रपट ‘1770’ चे मोशन पोस्टर प्रदर्शित

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसएस. राजामौली यांचा आगामी चित्रपट ‘१७७०’चे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची ऐतिहासिक कादंबरी ‘आनंदमठ’वर लवकरच एक चित्रपट येणार आहे. तो राजामौली यांचे सहाय्यक अश्विन गंगाराजू दिग्दर्शित करत आहेत. शैलेंद्र कुमार, सुजय कुट्टी, कृष्णा कुमार बी आणि सुरज शर्मा निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट एसएस 1 आणि पीके इंटरटेनमेंटच्या प्रयत्नातून साकार होत आहे.

चित्रपटाची कल्पना राम कमल मुखर्जी यांची आहे. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी स्क्रीनप्ले लिहिला आहे. हा एक ड्रामा चित्रपट असून त्याची निर्मिती राम कमल मुखर्जी करणार आहेत. पोस्टरमध्ये युद्धाचे दृश्य दिसते. हिंदीसह तेलुगु, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगालीतही चित्रपट झळकणार आहे. दिवाळीपर्यंत चित्रपटातील कलाकारांची घोषणा होऊ शकते. दरम्यान राजामौली सध्या ‘महाभारत’मुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

बातम्या आणखी आहेत...