आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Sooryavanshi Actors Akshay Kumar, Ranveer Singh And Ajay Devgn Have Shared A Video Message, Inviting Families To Come To Theatres For Their Film That Releases On November 5

'मध्यांतर संपले, आता शोटाइम आहे':5 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय 'सूर्यवंशी', अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह यांनी व्हिडिओ शेअर करत लोकांना चित्रपटगृहात येण्याचे केले आवाहन

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिन्ही स्टार्स एका चित्रपटगृहात दिसत आहेत.

अक्षय कुमार, रणवीर सिंह आणि अजय देवगण यांनी सिनेरसिकांना चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होत असलेल्या 'सूर्यवंशी' चित्रपटात हे तिघेही एकत्र दिसणार आहेत. अक्षयने चित्रपट रिलीज होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, 'मध्यांतर संपले, आता शोटाइम आहे. 'सूर्यवंशी' 5 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे.'

अक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिन्ही स्टार्स एका चित्रपटगृहात दिसत आहेत. सर्वप्रथम अक्षय म्हणतो, मित्रांनो, तुम्हाला हे ठिकाण आठवते का? या चार भिंतींनी तुमचे अनेक मूड पाहिले आहेत. रणवीर म्हणतो, याला तुमचे हसणे, तुमचे अश्रू आणि तुमचा राग चांगल्या प्रकारे लक्षात आहे. पुढे अक्षय म्हणतो, पण कोणीही विचार केला नाही की आपल्या आयुष्याप्रमाणे आपल्या चित्रपटांमध्येही एक मध्यांतर असेल. मग अजयची एंट्री होते. तो म्हणतो - अंधारानंतर प्रकाश येतो. आम्ही परत आलो आहोत. हा एकटेपणा आणि शांतता खूप झाली, आता पुन्हा एकदा चित्रपटगृहे या दिवाळीला जोरदार टाळ्यांच्या गजराने गजबजतील कारण पोलिस येत आहेत, असे रणवीर म्हणतो.

कोरोनामुळे दीड वर्षे अडकला चित्रपट
अक्षय कुमार स्टारर बहुप्रतिक्षित 'सूर्यवंशी' चित्रपटाचा ट्रेलर गेल्या वर्षी रिलीज झाला होता. हा चित्रपट गेल्या वर्षी मार्चमध्ये रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे चित्रपटाच्या रिलीजला ग्रहण लागले. 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा चित्रपटगृहे सुरू होणार आहेत, त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी लगेचच 5 नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली. चित्रपटात अक्षय मुंबई एंट्री टेररिझम स्कॉडचे अधिकारी सुर्यवंशीची भूमिका साकारत आहे. अक्षयव्यतिरिक्त या चित्रपटात कतरिना कैफ, गुलशन ग्रोव्हर, अभिमन्यू सिंह, जावेद जाफरी, जॅकी श्रॉफ, कुमुद मिश्रा, निकितन धीर आणि सिकंदर खेर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

अजय, रणवीरची स्पेशल एंट्री

रोहित शेट्टी दिग्दर्शित या कॉप ड्रामामध्ये सिंघम (अजय देवगण) आणि सिंबा (रणवीर सिंह) यांची स्पेशल एंट्री पाहायला मिळेल. क्लायमॅक्समध्ये सूर्यवंशी, सिंघम आणि सिंबा एकत्र दहशतवाद्यांशी लढताना दिसतील.

बातम्या आणखी आहेत...