आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे मोटिवेशन:2014 मध्ये सुष्मिता सेनला झाला होता 'हा' आजार,  नानचक वर्कआऊटचा मदतीने 4 वर्षांत आजारपणातून झाली सुटका

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या काळात स्टिरॉइड्स घ्यावी लागली ज्यामुळे शरीरावर दुष्परिणाम सहन करावा लागल्याचेही सुष्मिताने सांगितले.

सुष्मिता सेन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. अलीकडेच तिने आपल्या यूट्यूब चॅनलवर नानचक वर्कआऊट करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.  नानचक हे मार्शल आर्टचे एक शस्त्र आहे, ज्यामध्ये दोन काड्या साखळीला जोडल्या असतात. हे वर्कआऊट करण्यामागील गोष्ट सुष्मितानेही सांगितली आहे.

सुष्मिता एडिसन रोगाने ग्रस्त होती : 

आपल्या आजारपणाविषयी बोलताना सुष्मिता म्हणाली, ‘सप्टेंबर 2014 मध्ये मला एडिसन हा आजार असल्याचे समजले. या आजारामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. माझे शरीर मला पूर्ण थकलेले जाणवत होते. यामुळे निराशा वाढली. माझ्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे होऊ लागली. तो काळ किती कठीण होता हे मी शब्दांतही मांडू शकत नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला 4 वर्षे लागली. माझ्या मनाला खंबीर बनवण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. तेव्हापासून मी नानचक वर्कआऊटला सुरुवात केली.’ 

या काळात स्टिरॉइड्स घ्यावी लागली ज्यामुळे शरीरावर दुष्परिणाम सहन करावा लागल्याचेही सुष्मिताने सांगितले.

 

नानचक वर्कआऊटने केली कमाल

सुष्मिताने पुढे नानचक वर्कआउटचे कौतुक केले, ती म्हणाली 'या वर्कआऊटमुळे माझे अॅग्रेशन पूर्ण बाहेर पडले. मला या वेदनेतून मुक्त केले.  पुढे मला स्टिरॉइड्स घ्यावे लागले नाहीत आणि 2019 मध्ये मी या आजारातून मुक्त झाले. आपल्या शरीराला स्वत:पेक्षा चांगले कोणीच ओळखू शकत नाही. त्यामुळे स्वत:च्या मनाचे ऐका. आपल्या सर्वांमध्ये एक योद्धा दडलाय. त्यामुळे कधीच हार मानू नका.' या प्रवासात सहकार्य केल्याबद्दल शिक्षक नुपूर शिखरे यांचे आभारही सुष्मिताने मानले. 

बातम्या आणखी आहेत...