आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपट:रितेश आणि जेनेलियाच्या ‘वेड’  मराठी चित्रपटाचे टिझर प्रदर्शित

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा लवकरच ‘वेड' या मराठी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. त्याचवेळी निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित केला आहे. टीझरमध्ये रितेशच्या चित्रपटाची कथा अधुरे प्यारके किस्सेच्या कथेभोवती विणली गेली आहे. टीझरमध्ये रितेश प्रेम मिळाल्याचा आनंद आणि त्यानंतर आलेला एकटेपणा अतृप्त राहिल्याबद्दल बोलताना दिसत आहे. या चित्रपटाद्वारे दोघेही १० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत. या चित्रपटात सलमान खान देखील छोट्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रीकरणादरम्यानचे फोटो शेअर करून रितेशने याची माहिती दिली होती. चित्रपटात जिया शंकर, अशोक सराफ आणि शुभंकर तावडे यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. त्याचबरोबर रितेशने ऋषिकेश तुराई, संदीप पाटील यांच्यासोबत चित्रपटाची कथाही लिहिली आहे. चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...