आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज रिलीज होणार:“बिल्ली बिल्ली’ गाण्याचा टीझर; पुन्हा दिसली सलमान-पूजाची रोमँटिक केमिस्ट्री

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूडचा मेगास्टार सलमान खानच्या बहुचर्चित ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील दुसरे गाणे बिल्ली बिल्लीचा टीझर नुकताच समोर आला. याआधी चित्रपटातील ‘नइयो लगदा’ हे गाणे रिलीज झाले होते. या गाण्यात सलमान आणि पूजा हेगडे यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला होता. आता ‘बिल्ली बिल्ली’ या गाण्यात पुन्हा एकदा दोघांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतेय. ‘सौदा खरा खरा’ आणि ‘इश्क तेरा तडपावे’यांसारख्या चार्टबस्टर गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले गायक सुखबीर यांनी ‘बिल्ली बिल्ली’’हे गाणे गायले आणि कंपोज केले. ‘बिल्ली बिल्ली’ गाणे एक जबरदस्त पंजाबी डान्स नंबर आहे. सलमान खानची हुक स्टेप असलेले ‘’बिल्ली बिल्ली’’ हे गाणे उद्या म्हणजेच २ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमान खानने नुकतेच हटके अंदाजात एक व्हिडिओ शेअर करून या ‘बिल्ली बिल्ली’ या गाण्याची घोषणा केली, सलमानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये दोन मांजरी दिसत आहेत.

बातम्या आणखी आहेत...