आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वीजे चित्राने चेन्नईतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चित्राने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी तिने अशाप्रकारे जीवन संपवल्याने चाहते हादरले आहेत. चित्राने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे.
चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये तिने आत्महत्या केली आहे. नसरप्रीत भागात असलेल्या हॉटेलमध्ये चित्रा थांबली होती. दरम्यान प्रसिद्ध उद्योगपतीसोबत नुकताच तिचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर हे दोघे एकत्रदेखील रहात होते. मात्र, अचानकपणे चित्राने आत्महत्या जीवन संपवले आहे. नैराश्य आल्यामुळे चित्राने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. इवीपी फिल्मसिटीमधील चित्रीकरण संपल्यानंतर चित्रा रात्री 2.30 वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर तिने गळफास घेतला असल्याचे हेमंतने सांगितले.
विजय टीव्हीवर सुरु असलेल्या पॅनडियन स्टोअर्स या मालिकेतील तिची मुख्य व्यक्तिरेखा चांगलीच गाजत होती. चित्राने साकारलेली मुल्लई ही भूमिका प्रेक्षकांना आवडलेली होती. त्यातच चित्राने आत्महत्येसारखा निर्णय घेतल्यामुळे तिचे कुटुंबीय, सहकलाकार आणि चाहतेही धक्क्यात आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.