आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमकॉम वेबसिरीज:‘सिक्रेट ऑफ गावसकर’च्या कलाकारांनी धूमधडाक्यात साजरा केला खास क्षण

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्राइम, रोमान्स, अॅक्शन, वजनदार कथानक आणि उत्कृष्ट कलाकार यांची सांगड घालत ओटीटी विश्वावर राज्य करण्यासाठी क्राइम आणि थ्रिलरचा कॉकटेल घेऊन ‘सिक्रेट ऑफ गावसकर’ ही नवीकोरी वेबसिरीज तगड्या स्टारकास्टसह प्रेक्षकांसमोर आली. अल्पावधितच या वेबसिरीजने ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवला. ‘चंद्रा फिल्म एंटरटेन्मेंट’ निर्मित आणि ‘व्हीमास मराठी’ प्रस्तुत दिग्दर्शक तेजस लोखंडे दिग्दर्शित या क्राइम वेबसिरीजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. वेबसिरीजच्या यशाचे नुकतेच धुमधडाक्यात सेलिब्रेशन करण्यात आले. या कार्यक्रमाला हरीश दुधाडे, संग्राम समेळ, ज्ञानदा रामतीर्थकर, शिल्पा नवलकर, मीरा सारंग या कलाकारांनी हजेरी लावली होती. या मालिकेत हरीश दुधाडे, संग्राम समेळ, मयूर पवार, रमेश चांदणे, ज्ञानदा रामतीर्थकर, दीप्ती लेले, शिल्पा नवलकर, मीरा सारंग, सीमा कुलकर्णी, लतिका सावंत दिसतील.

बातम्या आणखी आहेत...