आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टोकियो:चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल एआय रोबोट, फिल्मचे नाव असेल- बी; 528 कोटी रुपये मेहनताना घेतोय रोबोट

टोकियोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जपानमध्ये बनतोय एआय बेस्ड जगातील पहिला चित्रपट, बजेट आहे- 5285 कोटी रु.

सामान्यत: चित्रपटातील मुख्य भूमिकेत नायक- नायिका दिसतात. मात्र, जपानमध्ये एक एआय रोबोट चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत दिसेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो अभिनयासाठी ७ कोटी डॉलर (सुमारे ५२८ कोटी रुपये) शुल्क घेत आहे. जपानमध्ये एआयवर आधारित जगातील पहिला चित्रपट तयार होत आहे. याच्या मुख्य भूमिकेत एक रोबोट दिसेल, जो एका महिलेची भूमिका करेल. चित्रपटाचे नाव असेल- बी. निर्मात्यांनी चित्रपटासाठी ७० कोटी डॉलर (सुमारे ५२८५ कोटी रु.) बजेट ठेवले आहे. २०२१ मध्ये चित्रपट प्रदर्शित होईल असे निर्मात्यांचे म्हणने आहे. निर्मात्यांनी सांगितले की, चित्रपटाच्या कथेचा केंद्रबिंदू आहे शास्त्रज्ञ. ती एआय महिलेला (अॅरिका) तयार करण्यात मदत करते. जी कृत्रिमरीत्या संचलित रोबोट आहे. तसेच अत्यंत संक्रामक कोविड- १९ शी पूर्णपणे लढण्यात सक्षम आहे. जपानी शास्त्रज्ञ हिरोशी इशिगुरो आणि कोहेई ओगावा यांनी त्यांच्या रोबोटिक्स संशोधनातील एक भाग म्हणून अॅरिका तयार केली आहे. त्यांनीच अॅरिकाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेला अभिनयाचे सिद्धांत लागू करणे शिकवले आहे.

रोबोटला सत्रांद्वारे आयुष्याबाबत शिकवले

निर्मात आणि लेखक सॅम खोए यांनी सांगितले की, अभिनयाच्या इतर पद्धतीत कलाकार आपल्या भूमिकेत आपल्या आयुष्यातील अनुभव सामिल करतात. मात्र, अॅरिकाला आयुष्याची काही माहिती नाही. भूमिका करण्यासाठी तिला स्क्रॅचने बनवण्यात आले होते. एक-एक सत्राच्या माध्यमातून तिला हालचाली आणि भावना शिकवायच्या होत्या. जसे तिच्या हालचालींची गती नियंत्रित करणे, तिच्या भावना आणि व्यक्तिमत्त्व विकासासोबत बॉडी लँग्वेजद्वारे सांगणे.

0