आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहितचे ओटीटी पदार्पण:‘इंडियन पुलिस फोर्स'च्या दुसऱ्या शेड्यूलचे चित्रीकरण 1 ऑगस्टपासून

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहित शेट्टी लवकरच प्राइम व्हिडिओची सिरीज ‘इंडियन पुलिस फोर्स'च्या दुसऱ्या शेड्यूलचे चित्रीकरण सुरू करत आहेत. वृत्तानुसार, ते १ ऑगस्टपासून या सिरीजच्या दुसऱ्या शेड्यूलचे चित्रीकरण सुरू करतील. ते सिद्धार्थ मल्होत्रांसोबत अ‍ॅक्शन दृश्यांचे चित्रीकरण करणार आहेत. या सिरीजमध्ये सिद्धार्थ पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रिकरणाचे दुसरे शेड्यूल मुंबईत सुरू होणार आहे. रोहित शेट्टी अ‍ॅक्शन आणि स्टंटसाठी प्रसिद्ध आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत एक भव्य सेट बनवला आहे. सिद्धार्थ आणि शिल्पा शेट्टीशिवाय इतर कलाकारही या अ‍ॅक्शन शेड्यूलच्या चित्रिकरणासाठी एकत्र येणार आहेत. रोहितची ही पहिलीच वेब सिरीज आहे. या वर्षी एप्रिलमध्ये त्याबाबत घोषणा करण्यात आली होती. तिचा टीझरही रिलीज करण्यात आला होता. या सिरीजचे दिग्दर्शन सुशांत प्रकाश करतील.

बातम्या आणखी आहेत...