आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • The Shooting Of 'Liger' Was Completed In 100 Days, During Training Vijay Practiced Martial Arts For Ten Hours Every Day

इनसाइड डिटेल्स:‘लायगर’चे चित्रीकरण 100 दिवसांत पूर्ण, प्रशिक्षणादरम्यान विजय दररोज दहा तास मार्शल आर्ट्सचा सराव करायचा

उमेश कुमार उपाध्याय । मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरी जगन्नाथ दिग्दर्शित ‘लायगर’ चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेम, अ‍ॅक्शन, ड्रामा हा या चित्रपटाचा यूएसपी असल्याचे दिग्दर्शक सांगतात. ‘लोकांना असे वाटते की हा खेळावर आधारित चित्रपट आहे, मात्र तो फक्त खेळावरच आधारित नसून त्यात सर्वकाही आहे. विजयचे पात्र अडखळत बोलणारे आहे. याचे चित्रीकरण रंजक होते. अडखळत बोलायची कल्पना विजयचीच. त्याने यासाठी सरावही केला. ‘लायगर’चे वर्किंग टाइटल ‘फायटर’ होते, मात्र ऋतिकच्या चित्रपटाशी ते साधर्म्य वाटणारे होते, त्यामुळे ‘लायगर’ या टायटलची नोंदणी करण्यात आली. चित्रपट यंदा जानेवारीत प्रदर्शित करण्याचे नियोजन होते, मात्र तो तयार व्हायलाच तीन वर्षे लागली. कोरोनामुळेही थोडा उशीर झाला. आता सर्व काम झाले आहे, २५ ऑगस्ट रोजी देशभरात प्रदर्शित करत आहोत.’

सेन्साॅरने ऑडिओत चार-पाच कट लावले पुरी सांगतात, ‘चित्रपटात ‘मनचली…’, ‘आफत…’, ‘अकडी बकडी…’ आदी एकूण सात गाणी आहेत. ‘आफत…’ हे रोमँटिक गीत लॉस एंजेलिसमध्ये चित्रीत करण्यात आले. दोन गाणी हाणामारीच्या दृश्यांदरम्यान आहेत. चित्रपटाच्या शेवटी असलेल्या ‘कोका 2.0…’ या पंजाबी गाण्याचे रीमिक्स केले आहे. चित्रपट १०० दिवसांत पूर्ण करण्यात आला. बहुतांश चित्रीकरण मुंबईत झाले. गोव्यात १५ दिवस, लॉस एंजेलिस आणि अमेरिकेत २० दिवस चित्रीकरण झाले. सेंसॉर बोर्डाने ऑडिओत चार-पाच कट लावले आहेत.’

चित्रपटात विजय देवरकोंडाच्या पात्राला मार्शल आर्ट््समध्ये नावलौकिक मिळवायचा आहे दिग्दर्शक पुरी पुढे सांगतात, ‘कथेतील हीरो वाराणसीचा आहे. त्याला मार्शल आर्ट््समध्ये राष्ट्रीय चॅम्पियन बनायचे आहे. या स्वप्नासह आई आणि मुलगा मुंबईत येतात, तेथे दोघेही चहा विकतात. विजयचे वडिल त्यांच्या काळातील प्रसिद्ध फायटर होते, फाइट करताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलालाही याच क्षेत्रात कारकीर्द घडवायची आहे. नॅशनल चॅम्पियन बनल्यानंतर तो इंटरनॅशनल चॅम्पियन बनण्यासाठी जातो. यादरम्यान त्याचे एका श्रीमंत मुलीवर प्रेम जडते. इंटरनॅशनल चॅम्पियन बनणे आणि प्रेमात काय काय होते, ही या चित्रपटाची कथा आहे.’

टायसनला साइन करणे सोपे काम नव्हते चित्रपटासाठी माइक टायसनला साइन करणे फार अवघड काम होते. यासाठी त्यांच्याशी एक वर्षापर्यंत संपर्क ठेवावा लागला. पुरी यांच्यानुसार, ‘त्यांच्याशी सपर्क करण्याचा मी दररोज प्रयत्न केला. त्यांच्याशी आणि त्यांच्या टीमशी १०० वेळा झूम कॉलवर चर्चा झाली. त्यानंतर अखेर एका वर्षाने त्यांच्याशी करार झाला. त्यांनी चित्रीकरणासाठी एकूण ६० दिवस दिले. ते लॉस व्हेगासमध्ये राहतात, म्हणून त्यांची दृश्ये तेथेच चित्रित करण्यात आली. त्यांनी तसे सांगितलेही होते.’

थायी फाइट मास्टरने डिझाइन केले अ‍ॅक्शन चित्रपटात आठ मोठी अ‍ॅक्शन दृश्ये आहेत. फर्स्ट हाफमध्ये चार, सेकंड हाफमध्ये चार मोठी अ‍ॅक्शन दृश्ये आहेत. एक फाइट झोपडपट्टी भागात, एक फाइट डोजोमध्ये तर एक फाइट रिंगमध्ये होते. थायलंडचे फाइट मास्टर केच्चा यांनी अ‍ॅक्शन दृश्ये डिझाइन केली आहेत. जर्मनी, इंग्लंड आदी देशांतून मिनी फायटर्स घेण्यात आले. हाणामारीच्या एका दृश्यात किमान ३० फायटर असायचे.

५० टक्के अ‍ॅक्शन दृश्ये व्हीएफएक्सवर चित्रीत सविस्तर माहिती देताना पुरी म्हणाले, की ‘चित्रपटात अ‍ॅक्शनची भव्यता आहे, त्यामुळे व्हीएफएक्सचा ५० टक्के वापर करण्यात आला आहे. उर्वरित सेट लावण्यात आला होता. चित्रपटात अनन्या पांडेचा लव्ह सीन आहे, त्यामुळे तिला हाणामारीचे प्रशिक्षण देण्यात आले नाही. मात्र, चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी विजयला थायलंड येथे जाऊन एक महिन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागले. त्याला केच्चा यांनी प्रशिक्षण दिले. हाणामारीच्या दृश्याआधी विजय १० दिवस सराव करायचा. त्याने वजनही वाढवले आहे.’

बातम्या आणखी आहेत...